Patients esakal
नाशिक

Nashik News: सुरगाणा तालुक्यात ठाणगाव बाऱ्हे येथे 50 ते 60 जणांना महाप्रसादातून विषबाधा; आकडा वाढण्याची भीती

रतन चौधरी

Food Poison : सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे येथे पन्नास ते साठ जणांना महाप्रसादातून विषबाधा झाली. ठाणगाव येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त गावकरी यांच्या तर्फे करण्यात आले होते. (50 to 60 people poisoned by Mahaprasad at Thangaon Barhe in Surgana taluka Nashik News)

सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान काल्याचे किर्तन होते या महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे समजते. या सर्वच रुग्णांना बाऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पोलीस निरीक्षक वाघ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून महाप्रसादाचा नमुना घेऊन तपासणी करीता पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र आज गुड फ्रायडे दिनानिमित्त सुट्टी असल्याने सर्वच आरोग्य कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. रुग्णांवर उपचार सुरू असून विषबाधेचे रुग्णांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील सर्वच रुग्णवाहिका बाऱ्हे येथे पाठविण्यात आल्या आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक वाघ हे करीत आहेत.

विषबाधा आकडा ७२ रुग्णांवर गेला असुन बाधितांवर उपचार सुरू आहे. पैकी एक जण योगिराज ठाकरे वय ५८ यास जिल्हा रुग्णालयात नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT