Corona Updates News  esakal
नाशिक

जिल्ह्यात 55 कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

अरुण मलानी

नाशिक : कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरत असताना काही महिन्‍यांपासून दैनंदिन बाधितांची संख्या एकआकडी राहात होती. मार्च अखेरीस व एप्रिलच्‍या सुरवातीस तर काही दिवस दैनंदिन बाधितांची संख्या शून्‍य राहिली. परंतु गेल्‍या काही दिवसांत या संख्येत वाढ झालेली आहे. तब्‍बल ११६ दिवसांनंतर दैनंदिन बाधितांची संख्या पन्नासहून अधिक राहिली. रविवारी (ता.२६) जिल्‍ह्‍यातील ५५ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. दुसरीकडे चाळीस रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केल्‍याची नोंद आहे. (55 patients Corona positive in nashik district update)

गेल्‍या १ मार्चला जिल्‍ह्‍यात ५८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले होते. मात्र त्‍यानंतरच्‍या कालावधीत ही संख्या घटत जाऊन शून्‍यापर्यंत आलेली होती. मार्च अखेरीस व एप्रिलच्‍या सुरवातीला पाच सहा दिवस दैनंदिन बाधितांची संख्या शून्‍य राहिली.

परंतु गेल्‍या काही दिवसांपासून बाधितांच्‍या संख्येत सातत्‍याने वाढ होऊन रविवारी ही संख्या पुन्‍हा एकदा पन्नासहून अधिक राहिली. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ३५, नाशिक ग्रामीण भागात बारा, मालेगाव महापालिका क्षेत्रात पाच तर जिल्‍हाबाहेरील तीन रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत घट झालेली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत अवघे पंचवीस अहवाल प्रलंबित होते. हे सर्व अहवाल नाशिक महापालिका क्षेत्रातील होते.

नाशिक शहराचा पॉझिटिव्‍हीटी दरदेखील वाढतो आहे. रविवारी जिल्‍ह्‍याचा पॉझिटिव्‍हीटी दर २.७३ टक्‍के राहिलेला असताना, नाशिक महापालिका क्षेत्रातील हा दर ५.७८ टक्‍के राहिला. सध्या सक्रिय असलेल्‍या २२९ बाधितांपैकी ४२ बाधितांमध्ये लक्षणे आढळून आलेली आहेत.

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येची स्‍थिती अशी

नाशिक महापालिका क्षेत्र---------१५०

नाशिक ग्रामीण क्षेत्र--------------६३

मालेगाव महापालिका------------६

जिल्‍हा बाहेरील-------------------१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT