Private Bus
Private Bus esakal
नाशिक

Nashik : वाहतूक शाखेकडून 55 खासगी बसेसला दंड!; निसरड्या रस्त्याबाबत मात्र ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि जादा प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी शनिवारी (ता. १५) दिवसभरात ५५ खासगी बसवर दंडात्मक कारवाई करीत सुमारे दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, त्याचवेळी डांबर वाहून गेल्याने खडी रस्त्यावर पसरून निसरड्या झालेल्या रस्त्याबाबत मात्र अजूनही जैसे थे आहे. (55 private buses fined by transport department Nashik Latest Marathi News)

औरंगाबाद मार्गावर मिरची हॉटेल नजीकच्या पेट्रोलपंप चौकात झालेल्या अपघातात १२ मृत्यू झाला. या अपघातानंतर वेगमर्यादा, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक हे प्रश्न ऐरणीवर आले. नंतर पोलिस यंत्रणा सक्रिय झाली.

परजिल्ह्यासह परराज्यातील खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई सुरू करीत जरब बसवण्याची पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी खासगी ट्रॅव्हल्स चालक-मालकांची बैठक घेत त्यांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले होते. शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारून शुक्रवार (ता. १४)पासून खासगी बसेसची तपासणी केली जात आहे.

त्यानुसार पहिल्या दिवशी ११७ बसची तपासणी करून त्यापैकी ३१ बसचालकांवर दंडात्मक कारवाई केली होती, तर एक बस प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात जमा केली आहे. शनिवारी पुन्हा शहरातील सहा वेशींवर तपासणी मोहीम राबवून दिवसभरात १४२ बसेस तपासण्यात आल्या. त्यापैकी ५५ बसमध्ये जादा प्रवासी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना नसल्याचे आढळून आले.

त्यामुळे ५५ बसचालकांना एक लाख ९८ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, शहरभर सध्या निकृष्ट रस्त्यामुळे पादचारी, दुचाकीधारक खडीयुक्त रस्त्यावर घसरून पडत आहेत. निकृष्ट स्त्यावरून रोज वाहन स्लिप होऊन अपघात होत असले, तरी त्याबाबत मात्र अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलिस कारवाई संशयाच्या भोवऱ्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT