water pumping motors esakal
नाशिक

नाशिक : गिरणा धरणावरील 56 खेडी नळयोजना विस्कळीत

संजीव निकम

नांदगाव (दि. नाशिक) : वितरण व्यवस्था व आवर्तनातील समन्वयाचा अभाव यामुळे गिरणा धरणावरील (Girna Dam) ५६ खेडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना (Regional Pipeline Supply Scheme) पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ऐन पावसाळ्याच्या (Monsoon) तोंडावर पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडून पडण्याला निमित्त मिळाले आहे ते योजनेवरील १८० अश्‍वशतीच्या तीनपैकी एक पंप बंद पडण्याचे. त्याचा परिणाम पिण्याच्या वितरण व्यवस्थेवर होऊन नांदगाव शहरासह मालेगाव, नांदगाव तालुक्यातील योजनेवरच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या आवर्तनाचा कालावधी वाढला आहे. अनेक ठिकाणी आता कमी दाबाने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. (56 village pipelines on Girna dam disrupted Nashik News)

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गिरणा धरणावरील ५६ खेडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची वाताहत झाल्याने आणि नळाला पाणी कधी येईल, याचा भरवसा नसल्याने विशेषतः गृहिणींची मोठी तारांबळ होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी नादुरुस्त झालेला पंप मालेगाव येथे पाठविण्यात आला असून, अद्यापही हा पंप दुरुस्त झालेला नसल्याने योजनेवरील तांत्रिक देखभाल करणाऱ्या यंत्रणेला स्टॅण्डबाय म्हणून ठेवलेला दुसराही पंप वापरावा लागत आहे. योजनेसाठी दर तासाला एक पंप दोन लाख ७३ हजार लिटर एवढ्या क्षमतेने पाण्याचा उपसा करीत असतो. एरवी दोन पंप वापरून धरणाच्या उद्‌भव विहिरीतून पाण्याचा उपसा केला जात असतो. मात्र, तीनपैकी एक पंप बंद पडल्याने स्टॅण्डबाय म्हणून ठेवलेला पंपही वापरला जात आहे. मात्र, सलग २४ तास उपसा करण्यामुळे पंप गरम होऊन नादुरुस्त होण्याची शक्यता असते.

त्यासाठी दोघे पंप आता तीन ते चार तासासाठी थंड करण्यासाठी बंद करावे लागत असल्याने उपसा होणाऱ्या पाण्याच्या दाबात परिणाम होऊन कमी क्षमतेने पाणी उचलण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम योजनेवरच्या पाण्यावर विसंबून असलेल्या नांदगाव शहर व ग्रामीण भाग, मालेगाव तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. बंद पडलेल्या पंप दुरुस्तीला किती काळ व वेळ लागेल, याबाबत कसलीच माहिती नसल्याने योजनेच्या आवर्तनाचे निश्‍चित केलेले वेळापत्रक कोलमडून पडले आहे.

दुरुस्तीवर लाखो रूपये खर्च

सध्या शहरासह तालुक्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच पाणी वितरण व्यवस्थेचे आवर्तन लांबल्याने कडक उन्हात पाण्याच्या कृत्रिम टंचाईची झळ बसू लागली आहे. जुनाट झालेल्या जलवाहिन्या, क्षमता कमी झालेली यंत्रसामुग्री यामुळे योजनेला कालबाह्य ठरवीत त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लाखो रुपये खर्ची पडत आहे. धरणाच्या उदभव विहिरीवर १८० अश्‍वशक्तीचे तीन पंप असून, आतापर्यंत अनेकदा त्यांच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. काहीवेळा नवे व्हीटी पंप बसविण्यात आले तरीही सलग उपशामुळे तेही खराब झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT