nurse recruitment esakal
नाशिक

Nashik News : आरोग्यसेवेवरील वाढता ताण कमी होणार; राज्यातील 597 परिचारिकांच्या पदमंजुरी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र शासनाने २०२२-२३ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर न केलेल्या राज्यातील ५९७ परिचारिकांच्या समायोजनास अखेर मंजुरी दिली आहे. या परिचारिकांची सेवा समाप्त केल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची भीती होती. मात्र, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नातून ही मंजुरी मिळाली आहे. (597 nurse recruitment by state healthcare Union Minister of State for Health Dr. Through efforts of Bharti Pawar nashik news)

राज्यात २०२२-२३ च्या आराखड्यानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये तीन हजार २०७ पदे मंजूर होती. मात्र, सुधारित आराखड्यात दोन हजार ६१० पदांनाच मंजुरी मिळाली होती. त्यामुळे ५९७ परिचारिकांच्या सेवेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांचे समायोजन करण्याची मागणी होत होती.

त्यासाठी अनेकदा आंदोलने देखील झाली. केंद्रीय मंत्री डॉ. पवार यांनी दिल्लीत महाराष्ट्रासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या परिचारिकांच्या सेवा समाप्त केल्याने आधीच रिक्त पदे असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व जिल्ह्यांतून या परिचारिकांना समायोजित करण्याची मागणी होत होती.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

ज्या परिचारिका एनयूएचएम, आरबीएसके, आदिवासी, बिगरआदिवासी, नक्षलग्रस्त व अर्बन आरसीएच अशा विविध ठिकाणी कार्यरत होत्या. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील ५९७ आरोग्यसेविकांना न्याय मिळाला.

याबद्दल आरोग्यसेविकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचेही आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT