Thieves misplaced goods in the house of Kailas Kale in Pandharinath Nagar. esakal
नाशिक

Nashik Crime News : अभोण्यात एकाच रात्री 6 घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

अभोणा (जि. नाशिक) : येथील पंढरीनाथ नगर, गणेश नगर, कन्सरा चौक या भागात गुरूवारी (ता. १) पहाटे साडेतीनच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. (6 burglaries in one night in abhona Nashik Latest Crime News)

नांदुरीरोड नवीन सिडको भागातील पंढरीनाथनगर, रो- हाऊस नंबर- ३ मधील रहिवासी व मोरया रेडिमेड कापड दुकानाचे मालक राहुल कैलास काळे यांच्या बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घराच्या वरच्या मजल्यावरील दोन्ही खोल्यांमधील सामान अस्ताव्यस्त करून लोखंडी कपाटातील रोख रक्कम आठ लाख व नऊ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (रुपये २७ हजार), तीन ग्रॅम वजनाची बाळी (रुपये ३ हजार), बावीस ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन (रुपये ६६ हजार), पंधरा ग्रॅम वजनाची एक सोन्याची पट्टी पोत (रुपये ४५ हजार) असा एकूण ९ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

पंढरीनाथ नगर, गणेश नगर, नवीन सिडको भागातील कन्सरा चौक व नांदुरीरोड पेट्रोलपंपाच्या मागील वसाहतीत एकूण सहा ठिकाणी घरफोड्या झाल्या. त्यात कन्सरा चौकातील घरातून १५ ग्राम सोने, इतर ठिकाणी किरकोळ रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. काही दिवसांपूर्वीच अभोणा व कनाशी भागात अशा घरफोड्या होण्याचे प्रकार घडले. त्या चोऱ्यांच्या तपासाचे काम सुरू असतानाच रात्री झालेल्या घरफोड्यांमुळे पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे आहे. कळवणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Yoga for Diabetes: काही मिनिटांचं मंडूकासन अन् शरीराला मिळतील ‘हे’ फायदे! जाणून घ्या डायबिटीसवर कसं आहे प्रभावी

SCROLL FOR NEXT