Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: गुंतवणुकीच्या आमिषाने 6 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील एकाला सहा लाखाला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.

वेगवेगळ्या बँक खात्यात रक्कम भरण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (6 lakh fraud with lure of investment Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राहुल बापू पाटील (रा. पोकार कॉलनी, दिंडोरी रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. २३ जुलैला ९६६९४९६२२८ या मोबाईल क्रमांकावरून पाटील यांच्याशी संपर्क साधला होता.

अल्गो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे संबंधितांनी आमिष दाखविल्याने पाटील भूलथापांना बळी पडले. ७४१५०१०२५१ व्हॉटसॲपवरून भामट्याने त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत एचडीएफसी आणि युनियन बँक खात्यावर त्यांना पैसे टाकण्यास भाग पाडले.

३ ऑगस्टला पाटील यांनी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यांवर ५ लाख ७३ हजार ३५० रुपयांची रक्कम भरली. मात्र त्यानंतर संशयिताने ट्रेडिंग माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक न करताच परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आल्याने पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. अधिक तपास सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT