crime news
crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : 6 महिन्यांपूर्वी अपहरण झालेली बालिका धाराशिवमध्ये सापडली; अपहरणकर्त्यास अटक

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सप्टेंबर 2022 मध्ये नांदूरशिंगोटे येथून अपहरण करण्यात आलेली पंधरा वर्षीय बालिका तब्बल सहा महिन्यांनंतर सापडली. सदर बालिकेसह तिचे अपहरण करणाऱ्या अनिल बाबासाहेब दिघे रा. तळेगाव दिघे यास धाराशिव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. (6 months ago Kidnapped girl found in Dharashiv Kidnapper arrested Nashik Crime News)

सदर बालिकेचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी देऊन देखील पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. मुलीचा शोध लागावा यासाठी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा बलिकेच्या पालकांनी दिल्यानंतर तातडीने सूत्रे हलवून पोलिसांनी अपहरण कर्त्यास ताब्यात घेतले.

अनिल दिघे याने नांदूरशिंगोटे येथून पंधरा वर्षीय बालिकेस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दिनांक 21 सप्टेंबर 20 22 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते.

अपहरण करणारा अनिल दिघे हा मुलीसह बेपत्ता झाल्यापासून त्याचे नातेवाईक अथवा इतर कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे तपासात अडथळे येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. तर बालिकेचे पालक व नातेवाईक यांच्याकडून पोलिसांच्या भूमिकेविषयी वारंवार संशय व्यक्त करण्यात येत होता.

सातत्याने पाठपुरावा करून देखील पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत बालिकेच्या पालकांनी प्रारंभी नांदूर शिंगोटे येथील पोलीस चौकीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यावेळी त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात थेट नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर पालक आत्मदहन करणार असल्याच्या इशाऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश वावी पोलीस ठाण्यातील नव्याने पदभार घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांना दिले होते.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

त्यानंतर श्री. लोखंडे यांनी घटनेची पार्श्वभूमी समजून घेत तपासाची दिशा निश्चित केली होती. अनिल दिघे याचे वडील बाबासाहेब अप्पाजी दिघे, भाऊ सुनिल बाबासाहेब दिघे, मित्र दिपक दादापाटील दिघे सर्व राहणार तळेगांव दिघे, ता संगमनेर यांना अटक करून त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला परंतु त्यांच्याकडून देखील अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते.

निफाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम राबवत श्री. लोखंडे व त्याच्या सहकाऱ्यांनी अनिल दिघे यांच्या विरोधातील तांत्रिक पुरावे जमा करण्यात यश मिळवले. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात अपहरणकर्त्यासह बालिकेला पोलिसांनी धाराशिव जिल्हयातून ताब्यात घेतले.

या दोघांना सोमवारी सकाळी वावी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्री. तांबे यांनी समक्ष उपस्थित राहून अपहरण झालेल्या अल्पवयीन बालिकेचा जबाब नोंदवून घेतला.

त्या आधारे अनिल दिघे याचे विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत तसेच विविध कलमांखाली अपहरण बलात्कार जबरदस्तीने दाबून ठेवणे असे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यास अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.

पोलीस संशयाच्या भोवऱ्यात...

सहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यावर वावी पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा होत असल्याचे अपहरण झालेल्या बालिकेच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी सुरुवातीपासून म्हटले आहे. प्रत्येक वेळेला पोलीस ठाण्यात आल्यानंतर थातुरमातूर उत्तरे देऊन बोळवण करण्यात यायची.

त्यामुळे शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले पालक नैराश्याने ग्रासले होते. त्यातूनच त्यांनी आत्मदहन आंदोलनासारखे टोकाचे पाऊल उचलले होते. पोलीस मुलीचा शोध लावण्यात सहकार्य करत नसल्यामुळे गेल्या आठवड्यात थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पालकांनी दिला होता.

त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करून अपहरण झालेल्या बालिकेचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून भरकटलेली पोलिसांची दिशा बुष्टरडोस मिळल्यासारखीअवघ्या चार दिवसात योग्य मार्गावर आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT