Navratri news esakal
नाशिक

Navratrotsav 2022 : सह्याद्री- राजमुद्राच्या दांडियासाठी 60 हजार चौरस फुटाचे मैदान

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : वासननगर येथे शिवसेनाप्रणीत सह्याद्री युवक मंडळ आणि राजमुद्रा वेल्फेअर फाउंडेशनतर्फे ५ एकर जागेत नवरात्रोत्सवानिमित्त भरविल्या जाणाऱ्या दांडिया आणि गरबामध्ये दांडियाप्रेमींना अकरा सोन्याच्या नथ, २१ पैठणी, मोबाईल, गिफ्ट कुपन्स यासह उत्कृष्ट जोडीसाठी इलेक्ट्रिक बाईक अशी लाखोंची बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार असल्याची माहिती संयोजक तथा माजी नगरसेवक अमोल जाधव आणि युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी दिली आहे. येथील गामणे मैदानात त्यासाठी दांडियाप्रेमींसाठी सुमारे साठ हजार चौरस फुटाचे मैदान तयार करण्यात येत आहे.

ऑर्केस्ट्रा आणि नवरात्रोत्सव दरम्यान भेट देण्यासाठी येणारे राजकीय नेते आणि सिनेकलाकरांसाठी स्वतंत्र १५०० चौरस फुटाचे व्यासपीठ उभारण्यात येत आहे. कालिका मातेचे मंदिर उभारण्यात येत असून, श्री हनुमान भजन करतानाचा हलता देखावा तयार करण्यात येत आहे. आकर्षक कारंजाची निर्मिती केली जाणार असून, त्यावर शेषनागावर बसलेले लक्ष्मीनारायण यांचा देखावा साकारणार आहे.

आनंद ठाकूर यांचे ४५०० शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन हे खास आकर्षण असेल. महिलांसाठी मोफत ३०० स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. नितीनकुमार यांचा लाइव्ह ऑर्केस्ट्रा आकर्षण असेल. आनंदमेळामध्ये विविध खेळणी, आकर्षक खेळांची रेलचेल असेल. युवा सेनेचे प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सभापती नीलम गोऱ्हे, वरुण सरदेसाई आदींना आमंत्रित केले आहे.

सोबत सिनेकलाकारांसोबत युवक- युवतींना दांडिया खेळण्याची संधी मिळणार आहे. दररोज उत्कृष्ट वेशभूषा आणि सादरीकरणासाठी महिलांना दररोज एक याप्रमाणे ११ सोन्याच्या नथ आणि रोज दोन महिलांना अशा २१ पैठणी, तर युवकांसाठी भेट कुपन मोबाईल आदी बक्षीसे ठेवली आहेत. सातत्याने उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या जोडीसाठी इ- बाईक हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ठेवले आहे. मंडळातर्फे ३०० जणांची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे. तीन भव्य एलईडी वॉल्सद्वारे जाधव यांचे सह्याद्री युवक मंडळ आणि शिरसाट यांच्या शिवमुद्रा वेल्फेअर फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. कोरोनाकाळात कोविड योद्धा म्हणून काम केलेले डॉक्टर्स, शिक्षक, पत्रकार, सामाजिक संस्था, मंडळे, सफाई कामगार आदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहेत.

प्रथमोपचाराच्या सुविधेसह सुसज्ज रुग्णवाहिकादेखील ठेवण्यात येणार आहे. शैलेश कार्ले, रवींद्र वाटेकर, संजय सोनवणे ,ज्ञानेश्वर यलमामे, मोहित पन्हाळे, बाळासाहेब काळे, रोहित जगताप, प्रथमेश विभूते, दीपक पंडित, ऋषिकेश रहाणे, सुनील आरोटे, सागर राजपूत, सूरज राऊत, साईनाथ निकम, अमोल वराडे आदी संयोजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT