Female students participating in immunization. esakal
नाशिक

Nashik News: 600 विद्यार्थिनींना गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लस! गुरुगोविंदसिंग फाउंडेशन, रोटरी, CPAAतर्फे उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : गुरुगोविंदसिंग फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन अर्थात ‘सीपीएए’तर्फे फाउंडेशनच्या प्रांगणात मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण शिबिराचा ६०९ विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे संचालक डॉ. आवेश पलोड, रोटरी अध्यक्षा डॉ. संगीता लोढा, सचिव सुरेश चावला, फाउंडेशनचे अध्यक्ष बलबीरसिंग छाब्रा, सचिव कुलजीतसिंग बिर्दी, सहसचिव कुलतरणसिंग सचदेवा, शरनदेवसिंग गिल, सीपीएएच्या डायरेक्टर डॉ. नूपुर खरे, असिस्टंट डायरेक्टर डॉ. प्रिया प्रसाद, लॅब ऑफिसर नाझिया खान यांची मुख्य उपस्थिती होती. (600 female students vaccinated against cervical cancer Activities by Guru Gobind Singh Foundation Rotary CPAA Nashik News)

डॉ. खरे यांनी विशेष लसीकरण मोहिमेबद्दल बोलताना सांगितले, की जगभरातील स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायवल कॅन्सर हा खूप चिंतेचा विषय आहे. स्त्रियांमध्ये सामान्यत: हा कर्करोग चौथ्या क्रमांकावर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार २०२० मध्ये केलेल्या एका सर्व्हेत जगात जवळपास ६ लाख ४ हजार महिलांना हा कर्करोग झाला होता. तर जवळपास ३ लाख ४२ हजार महिलांनी यामुळे आपला जीव गमावला होता.

हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) यामुळे होतो. हा एकमेव असा कर्करोग आहे, ज्याचा प्रतिबंध लसीकरणाद्वारे होऊ शकतो. त्यामुळे वय ९ ते २० या वयोगटातील सर्व मुली- युवतींनी ही लस घेणे गरजेचे आहे.

डॉ. लोढा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की योग्य काळजी घेतली तर प्रत्येक स्त्री निरोगी आयुष्य जगू शकते. आपल्याकडे याबाबत नियमित तपासणी केली जात नसल्याने सुरवातीच्या टप्प्यात हा आजार लक्षात येत नाही, मात्र लक्षात येतो तेव्हा तो गंभीर झालेला असतो.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची एचपीव्ही लस या कर्करोगाचे नक्कीच समूळ उच्चाटन करेल आणि यासाठी रोटरी क्लब सर्वतोपरी पुढाकार घेईल. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीही संस्था अग्रेसर असून रोटरॅक्ट क्लब माध्यमातून आमचे विद्यार्थी नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होतात.

भविष्यातही फाउंडेशन शिक्षणासोबतच जनसामान्यांच्या निरोगी आरोग्यासाठी शंभर टक्के योगदान देईल, असे फाउंडेशनचे अध्यक्ष छाब्रा यांनी सांगितले. पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य मनीष नंदवाणी यांनी सूत्रसंचालन केले.

तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. श्रीहरी उपासनी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT