Guardian Minister Dada Bhuse held a meeting with the representatives of Agriculture Department and Fertilizer Companies  esakal
नाशिक

Nashik Dada Bhuse : जिल्ह्याला 31 टक्के कमी खताचा पुरवठा; पालकमंत्र्यांनी केली कानउघाडणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dada Bhuse : जिल्ह्यासाठी कृषी विभागातर्फे यंदाच्या खरिपाकरिता ऑगस्टअखेर दोन लाख ६० हजार टन खताची मागणी करण्यात आली होती. कृषी आयुक्तालयाने दोन लाख २२ हजारांहून अधिक टन अनुदानित खतांचे आवंटन मंजूर केले.

प्रत्यक्षात ऑगस्टअखेर कंपन्यांनी एक लाख ९६ हजार ११८ टन खताचा पुरवठा करणे अपेक्षित होते. कंपन्यांनी ६८.५७ टक्के म्हणजे एक लाख ३४ हजार ४८८ टन खते विक्रीसाठी उपलब्ध करून दिली. (61 thousand 630 tons less fertilizers were available nashik news)

६१ हजार ६३० टन कमी खतांची उपलब्धता झाली. त्यात ६० हजार १७ टन युरिया जिल्ह्यासाठी कमी मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतटंचाईला सामोरे जावे लागत असून, खतांच्या लिंकेजच्या तक्रारींना तोंड फुटले आहे.

अगोदर पुरेशा पावसाअभावी यंदाचा काही तालुक्यांतील खरीप वाया जातो की काय, अशी शेतकऱ्यांमध्ये धाकधूक असताना खताच्या टंचाईची नवी समस्या उभी ठाकली. जिल्ह्यात खताच्या टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभाग आणि खत कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात खताच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर जिल्ह्यातील खतांचा तुटवडा थांबविण्याची ग्वाही देत श्री. भुसे यांनी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची पुरवठ्यातील फरकाबद्दल कानउघाडणी केली. चंबळ फर्टिलायझर ॲण्ड केमिकल, राष्ट्रीय केमिकल ॲन्ड फर्टिलायझर्स, इंडियन पोटॅश लिमिटेड, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, इफको, साउथर्न पेट्रोकेमिकल को-ऑपरेशन, नॅशनल फर्टिलाझर ॲन्ड केमिकल, कृभको, गुजरात स्टेट फर्टिलायझर, पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपन्यांकडून कमी प्रमाणात खतासह युरिया उपलब्ध करून दिल्याची माहिती बैठकीत चर्चेत आली.

खताच्या पुरवठ्याची कोंडी आठ दिवसांत सोडविण्याची सूचना श्री. भुसे यांनी केली. अनेक कंपन्यांनी आवंटनानुसार नियमित अनुदानित खतांचा पुरवठा जिल्ह्याला केला नसल्याची बाब श्री. भुसे यांच्या निदर्शनास आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कृषी विभागाने कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे सतत पाठपुरावा करूनही जिल्ह्यात खतांचे रेक उपलब्ध होत नाहीत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत कंपन्यांना लेखी पत्र दिल्याची बाब बैठकीत चर्चेत आली.

श्री. भुसे म्हणाले, की जिल्ह्यात जवळपास सर्व कंपन्यांनी मंजूर आवंटनानुसार अनुदानित खतांचा पुरवठा न केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब खत कंपन्यांच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात तत्काळ मंजूर आवंटनाप्रमाणे मागील पुरवठ्यातील तुटीसह शिल्लक खतपुरवठा करावा, युरिया खताचा प्राधान्याने तत्काळ पुरवठा करण्याबाबतचे आदेश संबंधित पुरवठादार कंपन्यांना देण्यात आले आहेत. पुण्याच्या कृषी आयुक्तांना समन्वय साधून खतटंचाईची समस्या आठवडाभरात सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.

खतांच्या पुरवठ्यातील तूट

(आकडे टनांमध्ये दर्शवितात)

० डीएपी- ३० हजार ९९०

० एमओपी- २ हजार ६०

० मिश्र- ६६ हजार ३११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

municipal elections exit poll 2026 : मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीच भारी; ठाकरेंचा गड ढासळणार अन् काँग्रेस आघाडीलाही फटका

INDU19 vs USAU19 World Cup : भारताची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी; हेनिल पटेल चमकला, पण वैभव सूर्यवंशीने किती धावा केल्या?

Municipal Election Result: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कधी सुरू होणार? सर्वात जलद निकाल कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

पुन्हा एकदा स्त्रियांवरच सिनेमा का केला? केदार शिंदेंचं ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' बद्दल स्पष्ट भाष्य

Latest Marathi News Live Update : कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जी.सी. चंद्रशेखर यांनी राजीव गौडा यांना नोटीस बजावली

SCROLL FOR NEXT