Actors of HAWRC Rangshakha Ozar Sanstha presenting scenes from the play Yeh Mamala Firse Gadbad Hai in the State Drama Competition. esakal
नाशिक

Rajya Natya Spardha : ‘ये मामला फिरसे गडबड है’तून प्रेक्षकांना हसविण्याचा धाडसी प्रयत्न!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एखाद्या विनोदी मराठी चित्रपटाचे कथानक रंगमंचावर सादर करण्याचा चांगला प्रयत्नही काही मर्यादांमुळे पुरेसा प्रभावी होणे शक्य नसते. याची जाणीव असतानाही प्रेक्षकांना मनमुराद हसविण्यात काही प्रमाणात यश मिळवणारा नाट्यप्रयोग शुक्रवारी (ता. १६) ‘ये मामला फिरसे गडबड है’ या विनोदी नाटकाच्या निमित्ताने बघावयास मिळाला.

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शुक्रवारी ओझरच्या एचएईडब्ल्यूआरसी, रंगशाखेने हे दोन अंकी विनोदी नाटक सादर केले. या संस्थेतर्फे दीपक तावरे यांनी हे नाटक सादर केले. (61st haushi Rajya Natya Spardha brave attempt to make audience laugh with Yeh Mamala Firse Gadbad Hai Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने नाटकात रंगत आणण्याचा प्रयत्न केला खरा; तरीही संस्थेच्या अथक प्रयत्नांना हवे तसे यश मिळू शकले नाही. मुळातच विनोदी प्रसंगाच्या अंगाने मजेदार वळण घेणारे कथानक असले, तरीही ते चित्रपटांतच अधिक प्रभावी ठरतात. रंगमंचावर काही मर्यादांमुळे मात्र असे प्रयोग हास्यास्पद ठरतात, याचीच प्रचिती देणारे हे धाडस ठरले. संदेश सावंत यांना लेखक आणि दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळताना मुख्य भूमिका साकारण्याचा मोह टाळता आला असता.

असे असतानाही त्यांनी भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रवीण मोकाशी, शंकर वाघमारे, विद्या भालेराव, राखी लढ्ढा, सुमन शर्मा, दीपक टावरे, भरत जाधव, पराग अमृतकर, गोपाल भगत, शीतल परमाळे या कलावंतांनी चांगली साथ दिली. मिलिंद मेधणे यांचे दिग्दर्शन साहाय्य आणि हेमंत सराफ यांचे नेपथ्य या जमेच्या बाजू होत्या. तर अन्य तांत्रिक बाजूंमध्ये जयदीप पवार यांची प्रकाशयोजना, राहुल कानडे यांचे संगीत संयोजन आणि मृणाल गीते यांची वेषभूषा या सारख्या बाजूदेखील उल्लेखनीय ठरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT