Dnyaneshwar Kundaria, who played the role of Ravana since seventeen years. esakal
नाशिक

Ravan Dahan 2022 : गांधीनगरला आज 58 फुटी रावणदहन; यंदा 67वे वर्ष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : गांधीनगरला बुधवारी (ता. ५) रावणदहनाचा कार्यक्रम सांयकाळी सहापासून सुरू होणार आहे. यासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक शैल हाडा या कार्यक्रमासाठी मुंबईहून हजेरी लावणार आहे. नाशिक शहर व पंचक्रोशीतील नागरिक गेल्या ६७ वर्षापासून या ठिकाणी एकत्र येत असतात. यासाठी पोलिस प्रशासनाकडून आणि रामलीला समितीकडून नियोजन करण्यात आले असून, सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. (67th year of Ravana Dahan to Gandhinagar ravan of 58 feet today Nashik Latest Marathi News)

प्रत्येक वर्षी ४० ते ५० हजार लोक रावणदहन कार्यक्रमाला हजेरी लावतात. प्रशासनातील अनेक अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. यावेळी रामायणातील सर्व पात्र आपल्या वेशभूषेसह रावणदहन कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात. १९५४ पासून चालत आलेली ही परंपरा आजपर्यंत टिकून आहे.

यावर्षी ५८ फूट रावणाची प्रतिकृती निर्माण करण्यात आलेली असून, सांयकाळी सात वाजता रावण जाळण्यात येणार आहे. यासाठी रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा, दसरा समिती अध्यक्ष पप्पू कोहली, दिग्दर्शक हरीश परदेशी, संजय लोळगे, प्रदीप भुजबळ, मनोहर बोराडे, सुनील मोदीयानी, भरत राव, सागर पुरी, साहिल शर्मा, तस्लिम पठाण आयोजन करीत आहे.

"कोरोनानंतर रावणदहन कार्यक्रम होत असल्याचा आनंद होत असून, सर्व कलाकार प्रेक्षकांसाठी विविध वेशभूषेत मनोरंजन करणार आहोत. गेल्या दहा दिवसापासून रामलीला समितीचे सर्वच कलाकार कष्ट घेत आहे." - रमाकांत वाघमारे, ज्येष्ठ नाट्यकलावंत

"रावणदहनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून, ५८ फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाकडून वाहतूक व सुरक्षेचा आढावा घेण्यात आलेला असून नागरिकांनी शक्यतो एक किलोमीटरवर वाहने लावून कार्यक्रमासाठी येणे पसंत केल्यास वाहतूक कोंडी होणार नाही." - महेश खैरनार, नाट्य कलावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Vasant Hankare: पोरांनाही रडवलं! वसंत हंकारेंनी स्वीकारलं चॅलेंज; म्हणाले, तू लाव कितीही ताकद...

Winter Low Water Intake Risks: हिवाळ्यात किती पाणी प्यायलं पाहिजे? प्रमाण कमी झाल्यास मेंदूसह शरीरावर होतात 'हे' परिणाम

SCROLL FOR NEXT