crime esakal
नाशिक

Nashik Crime News : एक लाख 15 हजार किंमतीचे 7 चोरीचे मोबाईल हस्तगत; मुद्देमालासह ताब्यात

१ लाख १५ हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल हस्तगत केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : चोरीचे मोबाईल नागरिकांना विकणाऱ्या एका इसमास सिन्नर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे ७ मोबाईल हस्तगत केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी,'सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरात अजिंक्यतारा येथे एक इसम मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून सिन्नर पोलिसांना मिळाली होती. (7 stolen mobile phones worth 1 lakh 15 thousand seized nashik crime news)

याबाबत चौकशीच्या सुचनेनंतर अंमलदार संबंधित ठिकाणी गेले. त्या ठिकाणी एक इसम हातात दोन-तीन मोबाईल घेऊन उभा असल्याचे त्यांना दिसले. त्यास हटकले असता तो पळून जाऊ लागला. पाठलाग करून पोलिसांनी पकडून त्याचे नाव विचारले असता त्याने विशाल भानुदास रनखांब (वय-१९) रा.झापवाडी सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक असे सांगीतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ मोबाईल सापडले आणि नंतर तपासात ५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. यामध्ये १५ हजार किमतीचा XIAOMI, १५ हजार किंमतीचा एक रेडमी, ४० हजार किमतीचा APPLE कंपणीचा I-Phone बंद, १४ हजार किमतीचा ओप्पो, ९ हजार किमतीचा VIVO, १० हजार किमतीचा सॅमसंग, १२ हजार किमतीचा OPPO असे एकूण १ लाख १५ हजार किंमतीच्या मोबाईलचा समावेश आहे.

या मोबाईलबाबत त्याला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या चोरीत आणखी कोणी साथीदार आहे का? अशी अधिकची चौकशी केली असता त्याने अनिकेत शेळके (रा.उदयोग भवन सिन्नर ता.सिन्नर) असे नाव सांगीतले.

हे सर्व मोबाईल जप्त करून त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपीचा पोलिस हवालदार एस. एस. गोसावी हे तपास करत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक शहाजी उमाप अपर पोलिसअधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलिस जवान समाधान बोराडे हेमंत तांबडे कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT