farmer.jpg 
नाशिक

20 हजार शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार!...कारण...

संतोष विंचू


नाशिक : (येवला) अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात दोन लाखांवरील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तालुक्‍यातील तब्बल दोन हजार 710 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असून, त्यांच्याकडील 23 कोटी रुपये भरल्यास 54 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे सुमारे 20 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. 

आजमितीस सुमारे 76 कोटी 58 लाख 19 हजार रुपयांची थकबाकी

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीत तालुक्‍यातील 18 हजार 483 शेतकऱ्यांना 200 कोटी अनुदान मिळणार आहे. योजनेचा लाभ न मिळणाऱ्यांनाही सवलत जाहीर झाल्याने दुग्धशर्करा योग मानला जात आहे. तालुक्‍यात दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले दोन हजार 710 लाभार्थी शेतकरी असून, त्यांच्याकडे आजमितीस सुमारे 76 कोटी 58 लाख 19 हजार रुपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील 22 कोटी 38 लाख रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. 

अभियानाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार 

ही रक्कम भरल्यानंतर शासनाकडून कर्जमाफीच्या लाभापोटी त्यांना 54 कोटी 20 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असून, तालुक्‍यात सुमारे एक हजार 38 पात्र शेतकरी असून, त्यांना सुमारे दहा कोटी 49 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे पीककर्ज तो फेडू शकला नाही. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियान राबविले जात असून, या अभियानाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

सरकारच्या कर्जमाफी योजनेमुळे तालुक्‍यातील सुमारे 20 हजार शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. दोन्ही सवलतींमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. यातून जिल्हा बॅंक पुन्हा एकदा सक्षमपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज होईल, असा विश्‍वास आहे. - राजेंद्र शिंदे, जिल्हा बॅंक निरीक्षक, येवला  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Horoscope 2026 : मेष ते मीन राशीपर्यंत..! 2026 वर्ष तुमच्यासाठी कसे असेल? वाचा नव्या वर्षाचं संपूर्ण वार्षिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

PCMC Election: अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या पक्षाची एन्ट्री होणार? निवडणुकीसाठी नवा डाव टाकला

Solapur News : "पोलिसात दाखल गुन्ह्यातील सर्वाधिक गुन्हे हे दारूचे"- पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे!

SCROLL FOR NEXT