electricity poll repaired by msedcl employee
electricity poll repaired by msedcl employee esakal
नाशिक

Nashik News : 70 फूट अंतर पोहून जात केला वीजपुरवठ्यातील बिघाड दूर; MSEDCLच्या कर्मचाऱ्याचे धाडस

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोलीकरणामुळे तलावात सुमारे वीस फूट खोलीपर्यंत असणारे पाणी... या पाण्यातून मार्ग काढत सुमारे 70 फूट अंतर पोहून जात मुख्य वीज वाहिनीवर असणारा बिघाड दूर करत सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी व पाथरे या दोन उपकेंद्रांचा सहा तास बंद झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे धाडस योगेश बापू वाघ या कर्मचाऱ्याने दाखवले. (70 feet swimming distance for repairing of power failure Courage of an employee of MSEDCL Nashik Latest Marathi News)

शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून वावी व पाथरे येथील उपकेंद्रांचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला होता. हा बिघाड शोधण्यासाठी दोन्ही उपकेंद्रांचे कक्ष अभियंता अजय सावळे व हर्षल मांडगे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सिन्नर ते वावी दरम्यान असलेल्या मुख्य वीज वाहिनीवर पेट्रोलिंग करत होते. काही कर्मचारी सिन्नरच्या बाजूने तर काही कर्मचारी वावीच्या बाजूने दापूर पर्यंत पेट्रोलिंग करत येत असताना गोंदे शिवारात असलेल्या गोंद नाल्यावर पाझर तलाव क्षेत्रात असलेल्या खांबावर बिघाड असल्याचे लक्षात आले.

या ठिकाणी तीन पैकी एका खांबावर कट पॉईंट असल्याने त्याच ठिकाणी बिघाड झाला होता. बिघाड सापडला पण तो दुरुस्त करायचा म्हटले तर चहुबाजूनी पाण्याने वेढलेल्या खांबापर्यंत जायचे कसे हा प्रश्न सर्वांसमोर होता. कारण समृद्धी महामार्गासाठी या तलावातील मातीचा उपसा करण्यात आल्याने व स्थानिक शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार वीस फूट खोलीपर्यंत पाणी होते. तलावाच्या काठापासून विजेच्या खांबाचे अंतर सुमारे 70 फूट इतके होते. तिथपर्यंत पोहोचायचे म्हटले तर एवढ्या लांबीची शिडी देखील नाही.

अशावेळी मूळचा मीठसागरे येथील रहिवासी व वावी,पाथरे उपकेंद्रात कार्यरत असलेला कर्मचारी योगेश बापू वाघ पुढे आला. मला चांगले पोहता येते. बिघाड दुरुस्त करण्यासाठी मी पाण्यातून पोहत खांबापर्यंत जातो. असे म्हणत त्याने उभय अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. मात्र,पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने परवानगी द्यायची कशी असा प्रश्न या अधिकाऱ्यांना पडला. सिन्नर ग्रामीण - 2 चे उप अभियंता ऋषिकेश खैरनार यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. वीजपुरवठ्यातील बिघाड दूर होणे गरजेचे असले तरी कर्मचाऱ्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगत श्री. खैरनार यांनी योगेशच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्याची सूचना केली.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांकडून तीन-चार मोठे दोर आणण्यात आले. हे दोर योगेशच्या कमरेला सुरक्षेसाठी बांधण्यात आले. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास योगेश पाण्यात उतरला. खांबापर्यंतचे अंतर सराईतपणे पोहून जात त्याने बिघाड झालेल्या खांबावर आरोहण केले. तेथील बिघाड दुरुस्त करायला त्याला एक तासाचा अवधी लागला. दुरुस्तीचे काम फत्ते केल्यावर पुन्हा आल्या मार्गाने पाण्यातून मार्गक्रमण करत तो सुरक्षित बाहेर आला. व त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास वावी व पाथरे येथील उपकेंद्रांचा तब्बल सहा तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

सहकाऱ्यांनी दिले प्रोत्साहन .....

पट्टीचा पोहणारा असलेला योगेश हाच खोल पाण्यात उतरून बिघाड दुरुस्त करू शकेल असा विश्वास त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांना होता. वरिष्ठांनी पाण्यात उतरून बिघाड दुरुस्त करण्याची परवानगी दिल्यावर सूरज लासुरे , आरीफ कादरी, संजय जगताप, आनंदा कुटे, सुभाष कुटे, मणीराम चव्हाण, हेमंत गवळी, प्रशांत नाटे, अक्षय खुळे या कर्मचाऱ्यांनी योगेशला प्रोत्साहन दिले. श्री. सावळे व श्री. मांडगे या अधिकाऱ्यांनी देखील सर्वांच्या मदतीने त्याच्या सुरक्षेची आवश्यक काळजी घेतली. व खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT