pregnant woman dies due to no suitable road nashik news  esakal
नाशिक

Nashik News: ‘वनिता’च्या मृत्यूनंतर रस्त्यासाठी 70 लाखांचा प्रस्ताव

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रस्त्याअभावी जुनवणेवाडी (ता. इगतपुरी) येथील गरोदर महिलेला चालत जावे लागल्याने तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जाग आलेल्या जिल्हा परिषद व आदिवासी विकास विभागाने या रस्त्याच्या कामासाठी ७० लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी बुधवारी (ता. २६) जुनवणेवाडी ते तळोघ या रस्त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. (70 lakh proposal for road after death of Vanita Nashik News)

पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून रस्त्याबाबत माहिती घेतली. संबंधित रस्ता हा ग्रामीण श्रेणीतील असून, जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहे. त्यातच या रस्त्याचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या यादीत करण्यात आलेला आहे.

मात्र, ग्रामसडक योजना विभागाकडे पुरेसा निधी नसल्याने त्याचे काम होऊ शकले नाही व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता होईल, या कारणामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नियोजन करताना त्याचा विचार केला नाही.

परिणामी, हा रस्ता वर्षानुवर्षे तसाच राहिला. ना त्याची दुरुस्ती झाली, ना नवीन काम झाले. यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून कोणतेही वाहन चालविता येत नाही. दुचाकी, चारचाकी वाहने चालविण्याचा प्रयत्न केल्यास ते गाळात रुतून बसतात, अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरवर्षी ठेकेदारांच्या कामांनाच प्राधान्य

दरवर्षी रस्तेकामांचे नियोजन करताना कामे सुचविणारे लोकप्रतिनिधी असो अथवा कामांचे आराखडे तयार करणारे अधिकारी प्रत्यक्ष निकड लक्षात घेण्याऐवजी ठेकेदारांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देतात.

यातून ठेकेदारांना काम करण्यास अडचणीचे असणारे असे रस्ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहतात. यामुळे दरवर्षी रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही दुर्लक्षित रस्ते तसेच राहतात. या रस्त्यांवर एखादी दुर्घटना घडल्यास या यंत्रणेला जाग येते व रस्ते बनविण्याचे प्रस्ताव तयार केले जातात.

"बांधकाम विभागाकडून या तीन किलो मीटरपैकी अर्ध्या रस्त्यासाठी ७० लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जाणार आहे. तेथून निधी न मिळाल्यास आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी उपयोजनेतून निधीची मागणी केली जाईल."

- डॉ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT