754 villages in district are doing waste management in village itself nashik news
754 villages in district are doing waste management in village itself nashik news esakal
नाशिक

Nashik Waste Management : जिल्ह्यातील 754 गावे करताहेत गावातच कचऱ्याचे व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Waste Management : केंद्र सरकारच्या स्वच्छता व पेयजल विभागाकडून देशात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये, शाळा आणि अंगणवाड्यांना शौचालये याला प्राधान्य देण्यात आले. (754 villages in district are doing waste management in village itself nashik news)

याची उद्दिष्टपूर्ती झाल्यावर आता दुसऱ्या टप्प्यात गावातील सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येत असून, गावातील सांडपाण्याचे व घनकचऱ्याचे गावपातळीवरच व्यवस्थापन करण्यात येत आहे.

गावातील प्रमुख समस्या असणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण करून गावातच त्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती होईल. यात जिल्ह्यातील सर्व एक हजार ३८४ ग्रामपंचायती सहभागी असून, आतापर्यंत ७५४ कामे पूर्ण झाली आहेत.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्व महसुली गावांमध्ये काम करण्यात येत असून, गावांना निधी देण्यात येत आहे.

जिल्ह्यात एक हजार ९१० महसुली गावे आहेत. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात जिल्ह्यातील सर्व एक हजार ९१० गावे सहभागी असून, आतापर्यंत ७५४ गावांमध्ये सांडपाणी व घनकचऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

गावात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी ठिकठिकाणी कंपोस्ट खड्डे तयार करण्यात येत असून, यापासून भविष्यात गावांना उत्पन्नही मिळेल.

हे कंपोस्ट खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून, एकीकडे कचऱ्याची विल्हेवाट, दुसरीकडे खतनिर्मिती असे दुहेरी हेतू यातून साध्य होणार आहेत.

कचरा व्यवस्थापनात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावयाचा असून, या कचऱ्यातील प्लास्टिक आणि धातू वेगळे करावयाचे आहेत. यासाठी गावपातळीवर कचरा विलगीकरण शेड बांधण्यात येत आहे.

ज्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण होणार असून, विक्रीयोग्य कचऱ्याची विक्री करता येईल. तसेच, गावात ठिकठिकाणी ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी सार्वजनिक कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. कचरा वाहतुकीसाठी तीनचाकी सायकली घेण्यात येत असून, त्याद्वारे कचरा जमा करण्यात येत आहे.

७५४ कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र, उर्वरित कामेही सुरू आहेत. ही कामे लवकर पूर्ण होतील. त्यासाठी बैठक घेण्यात आल्याचे पाणी स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी सांगितले.

१) घनकचरा व्यवस्थापनेतील कामे : सार्वजनिक स्तरावर कंपोस्ट खतखड्डे (नॅडेप), सार्वजनिक कचराकुंड्या, तीनचाकी सायकली, प्लास्टिक शेड, कचरा वर्गीकरण शेड.

२) सांडपाणी व्यवस्थापनेतील कामे : सार्वजनिक व वैयक्तिक स्तरावर शोषखड्डे, पाझरखड्डे.

तालुकानिहाय सुरू असलेली कामे

तालुका सहभागी ग्रामपंचायती पूर्ण झालेली कामे

बागलाण १३१ ९०

चांदवड ९० ३८

देवळा ४२ १९

दिंडोरी १२१ ६४

इगतपुरी ९६ ३१

कळवण ८६ ७५

मालेगाव १२५ ३५

नांदगाव ८८ २५

नाशिक ६६ ३०

निफाड ११८ ४६

पेठ ७३ ४३

सिन्नर ११४ ५१

सुरगाणा ६१ १००

त्र्यंबकेश्वर ८४ ५६

येवला ८९ ५१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT