Jal Jeevan Mission esakal
नाशिक

Jal Jeevan Mission Scheme : जिल्ह्यातील 77 ‘जलजीवन’च्या योजना अद्यापही कागदावर!

नियोजनानुसार १४१० कोटींपैकी आतापर्यंत अवघे २६४ कोटी खर्च

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission Scheme : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांवरून ओरड सुरू असताना दुसरीकडे २० मेअखेर जिल्ह्यातील तब्बल ७७ कामे सुरू झालेली नसल्याचे समोर आले आहे.

पाच महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल कामे सुरू करण्यासाठी डेटलाइन देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामांना सुरवात झालेली नाही.

मंजूर झालेल्या एक हजार २२२ योजनांपैकी एक हजार ४७ कामे प्रगतिपथावर आहेत, तर ९८ कामे केवळ पूर्ण झालेली आहेत. निधी खर्चाचा विचार केल्यास एक हजार ४१० कोटींपैकी आतापर्यंत फक्त २६४ कोटी (१८ टक्के) खर्च झाला आहे. (77 Jal Jeevan Mission Scheme in district still on paper nashik news)e

जिल्ह्यातील एक हजार २९६ गावांसाठी एक हजार २२२ जलजीवन योजना मंजूर झाल्या आहेत. यात ६८१ योजना रेट्रोफिटिंग, तर ५४१ योजना नवीन आहेत. यासाठी १४१०.३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर योजनेचे काम सुरू होणे अपेक्षित असताना त्या वेळेत सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जानेवारीत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ठेकेदार, ग्रामसेवक, शाखा अभियंता यांची बैठक घेत कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश काढले होते.

त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्येही बैठक घेऊन कामे सुरू करण्याकरिता ठेकेदारांना डेटलाइन दिली होती, असे असतानाही जिल्ह्यात अद्यापही ७७ कामांना मुहूर्त लागलेला नाही. प्रामुख्याने पाण्याचे स्रोत उपलब्ध न होणे, वन, जलसंपदा विभागाची परवानगी न मिळणे, गावांतर्गत वाद यामुळे या योजना सुरू झालेल्या नाहीत.

यात प्रामुख्याने चांदवड तालुक्यातील १४, तर पेठ तालुक्यांमधील १३ योजनांचा समावेश आहे. तर इतर तालुक्यांमध्येही साधारण सरासरी दोन ते पाच योजना सुरू झालेल्या नाहीत. मंजूर झालेल्या एक हजार २२२ योजनांपैकी एक हजार ४७ कामे प्रगतिपथावर आहेत, तर ९८ योजना फक्त पूर्ण झालेल्या आहेत.

या योजना पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. यामुळे तोपर्यंत योजना पूर्ण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद प्रशासन व ठेकेदार यांच्यासमोर आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रशासन सापडले कोंडीत

जिल्हाभरातील ७७ योजना विविध कारणांनी सुरू झालेल्या नाहीत. असे असताना झालेल्या कामांबाबत तक्रारी सुरू झाल्या असून, त्यांची पडताळणी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे.

त्यामुळे सुरू न झालेली कामे सुरू करण्याकरिता प्रयत्न करावे की झालेल्या कामांची पडताळणी करावी, असा प्रश्न प्रशासनासमोर पडल्याने प्रशासन कोंडीत सापडले आहे.

तालुका योजना किंमत झालेला खर्च प्रगतीतील कामे अपूर्ण कामे पूर्ण कामे

बागलाण ११२ १४९.५२ कोटी ३८.६३ कोटी १०१ १ १०

चांदवड ७४ ८७.५३ कोटी १०.२३ कोटी ५३ १४ ७

देवळा ३३ ४७.४९ कोटी ९.४५ कोटी २५ २ ६

दिंडोरी १०४ ११०.४४ कोटी २४.५ कोटी ९० २ १२

इगतपुरी ९१ ९७.६१ कोटी २४.५९ कोटी ८४ २ ५

कळवण १२७ १०२.४६ कोटी २२.०७ कोटी १०२ ६ १९

मालेगाव ५५ ५९.७८ कोटी ७.१८ कोटी ४४ ७ ४

नाशिक ५५ ९३.४१ कोटी १०.७७ कोटी ५० ४ १

नांदगाव २६ २७.१० कोटी ११.७६ कोटी १८ ३ ५

निफाड ९५ ११७.१९ कोटी २८.१९

कोटी ८० २ १३

पेठ ८५ ९८.५९ कोटी ७.९८ कोटी ७१ १३ १

सिन्नर ८० ११५.२४ कोटी १९.४८ कोटी ७३ ७ ०

सुरगाणा १६४ १६४.१५ कोटी २४.१४ कोटी १४९ ५ १०

त्र्यंबकेश्वर ८५ ११०.३१ कोटी १४.५३ कोटी ७८ ७ ०

येवला ३६ २९.११ कोटी १०.२० कोटी २९ २ ५

एकूण १२२२ १४१००१.३५ कोटी २६४०३.९८ कोटी १०४७ ७७ ९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT