corona vaccination esakal
नाशिक

Nashik : 18 वर्षांपुढील 77 टक्‍के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

अरूण मलाणी

नाशिक : नाशिक महापालिका (NMC) क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) सुरू असून, चार महापालिका रुग्‍णालये व ३० शहरी प्राथमिक आरोग्‍य केंद्रांवर (Primary healthcare center) लसीकरण सुविधा उपलब्‍ध आहे. आत्तापर्यंत १८ वर्षांपुढील ९६ टक्‍के नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस झालेला असून, त्‍यापैकी ७७ टक्‍के नागरीकांनी दोन्‍ही डोस घेतलेले आहेत. (77 percent of citizens under 18 years of age have been vaccinated Nashik News)

शहरातील शाळा व महाविद्यालयांनी त्‍यांच्‍या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मागणी केल्‍यास तेथे लसीकरण केले जाते आहे. कोरोना थोपविण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविणे आवश्‍यक असून, अद्यापही चार टक्‍के नागरीकांनी लसीकरण करून घेतलेले नाही. अशा लाभार्थ्यांनी तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. फ्रंटलाइन वर्कर, आरोग्‍य क्षेत्रातील कर्मचारी व साठ वर्षांपुढील लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्‍याने त्‍यांना महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस घेण्याचेही आवाहन केले आहे. १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले असल्‍यास खासगी लसीकरण केंद्रावर शुल्क देऊन बूस्टर डोस घेता येणार आहे.

हर घर दस्‍तक मोहिमेला सुरवात

कोरोना महामारीच्‍या संभाव्‍य चौथ्या लाटेच्‍या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. त्‍यामुळे लसीकरण वाढविणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे ३१ जुलैपर्यंत हर घर दस्तक मोहीम- २ राबवली जाते आहे. यामध्ये वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन लसीकरण करतील. लसीकरण करून घेत मोहिमेस नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्‍त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT