8 km double tunnel on mumbai-nagpur samrudhi highway completed in record time  Sakal
नाशिक

'समृद्धी'वरील 8 किमीचा दुहेरी बोगदा विक्रमी वेळेत पूर्ण

पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंतच्या आठ किलोमीटर लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. भारतातील सर्वांत रुंद आणि चौथ्या क्रमांकाचा दुहेरी बोगदा आहे. या महामार्गावर मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहून येण्यासाठी स्वतंत्र आठ किलोमीटरचे दोन बोगदे तयार झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील कसारा घाट भेदून इगतपुरीजवळ हे बोगदे तयार करण्यात आले.

दोन्ही बोगद्याची लांबी आठ किलोमीटर असून रुंदी १७.५ मीटर आहे. एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, परितकर, पारीख व त्यांच्या दीड हजार कामगार व दीडशे अभियंते अशा बाहुबली टीमने हे शिवधनुष्य पेलले. या बोगद्याने आणखी एक विक्रम नोंदवला तो म्हणजे आठ किलोमीटरचा हा दुहेरी बोगदा केवळ दोन वर्षात पूर्ण झाला आहे.

अभियांत्रिकीचा चमत्कार

अभियांत्रिकीच्या इतिहासात भारतात तरी अशी नोंद नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. ५५ हजार कोटी रूपयांचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सातशे किलोमीटरचा असून इगतपुरीतील दुहेरी बोगदा हा या महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा आहे. २७४५ कोटी रुपये खर्च करून हा बोगदा खोदण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर करण्यात आला होता.

कसारा घाट पाच मिनिटात पार

कसारा घाट पार करण्यासाठी वाहतूक कोंडी नसेल तर आजच्या घडीला ३० ते ३५ मिनिटे लागतात. मात्र या बोगद्यातून कसारा घाट पार करण्यासाठी केवळ पाच मिनिटे लागणार आहेत. दोन वर्षात दुहेरी बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अभियंत्यांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT