voter registration Esakal
नाशिक

New Voter Registration: नवमतदारांची 80 टक्के ऑनलाइन नोंदणी; वर्षभरात 59 हजार मतदार वाढले

सकाळ वृत्तसेवा

New Voter Registration : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात ५८ हजार ८०३ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे यातील ८० मतदारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केल्याचे निवडणूक विभागाने म्हटले आहे.

जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. निवडणूक विभागातर्फे नवमतदारांची ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी केली जाते. ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. (80 percent online registration of new voters nashik news)

मात्र, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सर्वाधिक पसंती ही ऑनलाइनला मिळत असल्याचे गेल्या अकरा महिन्यांतील आकडेवारीवरून सिद्ध होते. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ५८ हजार ८०३ मतदारांची नोंद झाली आहे. यातील ८० टक्के मतदारांनी ऑनलाइन नोंदणी केल्याचे दिसून येते.

त्यापैकी कागदपत्रांअभावी सात हजार ३७२ मतदारांची नोंदणी रद्द करण्यात आली असून, ३३ हजार ५६४ मतदारांची नोंदणी निवडणूक विभागाकडे अद्याप प्रलंबित आहे. निवडणूक विभागातर्फे दरवर्षी ५ जानेवारीला सुधारित मतदार यादी प्रसिद्ध केली जाते.

त्यानंतर वर्षभर ही यादी अद्ययावत करण्याचे काम चालते. यात नवमतदार, दिव्यांगांची नोंदणी केली जाते. मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तींच्या नावात दुरुस्ती, पत्त्यातील बदल ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने केले जातात.

अशी झाली नोंदणी

जानेवारी ते आजअखेर जिल्ह्यातील ५८ हजार ८०३ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४५ हजार ४६८ मतदारांनी ऑनलाइन नोंदणी केली. एक हजार १११ मतदारांनी फक्त ऑफलाइन म्हणजेच पारंपरिक पद्धतीने नोंद केली. यावरून नवमतदार हे ऑनलाइन नोंदणीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT