Corona updates latest marathi news
Corona updates latest marathi news esakal
नाशिक

Corona Update : जिल्ह्यात 80 पॉझिटिव्‍ह, 58 रुग्‍ण कोरोनामुक्‍त

अरूण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची (Corona Patients) संख्या सौम्‍य स्वरूपात वाढत चालली आहे. रविवारी (ता. १०) जिल्ह्यात ८० रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive Cases) आले, तर ५८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २२ ने वाढ झाली झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२१ वर पोचली आहे. (80 positive 58 patients corona free in district Nashik Corona Update News)

नाशिक महापालिका क्षेत्रात रविवारी ५४ बाधित आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमधील अठरा, तर जिल्‍हाबाहेरील आठ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रात दिवसभरात नव्‍याने बाधित आढळून आला नाही. सध्या उपचार घेणाऱ्या ४२१ बाधितांपैकी दोघांना उपचारात ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासते आहे.

नाशिक ग्रामीणमधील २०५, नाशिक शहरातील १७४, तर मालेगाव १८, जिल्‍हाबाहेरील २४ बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या घटली असून, सायंकाळपर्यंत अवघे पंधरा अहवाल प्रलंबित होते. हे सर्व नाशिक महापालिका क्षेत्रातील होते.

पॉझिटिव्हिटी दरात वाढ

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. रविवारी हा दर ७.६० टक्‍के राहिला. नाशिक महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर दोन आकड्यांवर गेला असून, १६.२७ टक्‍के इतकी नोंद झाली आहे. नाशिक ग्रामीणमधील पॉझिटिव्हिटी दर २.८७ टक्‍के राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! टोल नाक्यावर 160 रूपयांसाठी वाद; महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली कार अन्...VIDEO VIRAL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना, कोठे करायचा अर्ज; राज्यात सोलापुरातून पहिली शिफारस

SCROLL FOR NEXT