Kharif Season Sowing esakal
नाशिक

Nashik News: खरिपाच्या राज्यात 84 टक्के पेरण्या; छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती विभाग आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यात खरिपाच्या आतापर्यंत ८४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात ९२, लातूरमध्ये ९०, अमरावतीत ९४ टक्के पेरण्या उरकल्या असून, पेरण्यांत हे तीन विभाग आघाडीवर आहेत.

तसेच, नाशिक विभागात ८५, नागपूरमध्ये ७७ टक्के, कोकणात ६१, पुणे विभागात ६५, कोल्हापूरमध्ये ५४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. (84 percent sowing in kharif crop state Chhatrapati Sambhaji Nagar Latur Amravati division in front Nashik News)

भातावर पिवळी खोडकीड, निळे भुंगेरे या किडींचा, सोयाबीनवर हेलीकोव्हर्पा, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, चक्रीभुंगा, उंट अळी, शंखी गोगलगाय, मका पिकावर लष्करी अळी, तर कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळू लागला आहे.

राज्यात काही टिकाणी भात, नाचणीची धूळवाफ पेरणी झाली असून, रोपवाटिकेतील भात, नाचणीची रोपांची पुनर्लागवडीची कामे सुरू झाली. कपाशी, मका, सोयाबीन, तूर, ज्वारी, भुईमूग पिके उगवण ते रोपापासून वाढीच्या अवस्थेत आहेत.

मूग, उडीद पिकांचे क्षेत्र सोयाबीन, कपाशी, मका व तुरीकडे वर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात ७५, धुळे आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी ८५, जळगावमध्ये ९३ टक्के पेरणी झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्यातील खरीप पेरणीची स्थिती (पेरणीचे आकडे टक्केवारीत)

पिकाचे नाव लागवड/पेरणी

भात ५५

ज्वारी ३३

बाजरी ३३

रागी ३४

मका ८०

तूर ७७

मूग ३७

उडीद ५०

भुईमूग ५४

तीळ २५

कारळे ३०

सूर्यफूल ६

सोयाबीन १०९

कपाशी ९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : इटलीत बंद पाडलेली विषारी 'यंत्रणा' रत्नागिरीत... कोकणचं भविष्य धोक्यात?, PFAS काय आहे? Italy मध्ये काय घडलं होतं?

Mumbai Crime: वर्दीला कलंक ! मुंबईत गजबजलेल्या उद्यानात पोलिस अधिकाऱ्याचे गतीमंद महिलेसोबत अश्लील कृत्य, नागरिकांनी बेदम चोप दिला अन्...

Pune Scam : पुणेकरांनो अलर्ट! मोबाईलवर RTO कडून आलाय ई-चलनचा मेसेज? आता बँक अकाऊंट होईल रिकामं..नेमका फ्रॉड काय पाहा

Satara News: अभिजीत बिचुकलेंचा नवा विक्रम! जुन्या मतांच्या रेकॉर्डला टाकले मागे, अपक्ष उमेदवारांच्या यादीत मिळवले दुसरे स्थान..

न्याय राहुदे पण अन्याय तरी करू नका, आंदेकरांना तिकीट दिलंत तर..., बंडू आंदेकरांच्या लेकीचा सर्वपक्षीयांना इशारा

SCROLL FOR NEXT