dengue sakal
नाशिक

Nashik Dengue Disease : शहरात डेंगीचा उद्रेक; सप्टेंबर महिन्यात 840 संशयित रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue Disease : शहरात सप्टेंबर महिन्यातील तीन आठवड्यात डेंगी संशयित रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

तब्बल ८४० डेंगूचे संशयित रुग्ण आढळले असून त्यातील १९६ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे शहरात धूर व औषध फवारणी कागदावरच होत असल्याचे दिसून येत आहे. (840 suspected patients of dengue in September nashik news)

शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डेंगीचे बहुतांशी नियंत्रण नागरिकांच्या हाती असले तरी महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून धूर फवारणी व औषध फवारणी होणे देखील तितकेच गरजेचे आहे. मात्र कामकाज फक्त कागदावर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जानेवारीत १७, फेब्रुवारीमध्ये २८, मार्च २८, एप्रिलला आठ, मे मध्ये नऊ तर जूनमध्ये १३ डेंगीचे रुग्ण आढळून आले होते.

त्यानंतर डेंगीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढल्याचे दिसून येत आहे. जुलैमध्ये १४४ डेंगीचे रुग्ण होते. ऑगस्टला हाच आकडा ११७ पर्यंत पोचला. सप्टेंबरमध्ये तीन आठवड्यात ८४० डेंगीचे संस्थेत रुग्ण आढळले.

त्यातील १९६ अहवाल पॉझिटिव्ह आले. डेंगी बाधितांचा एकूण आकडा ४५७ च्या पुढे गेला आहे. सदरचा आकडा महापालिकेच्या रुग्णालयांमधील असून खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण आढळून येत आहे. डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून काढणे व नष्ट करण्यासाठी शहरात ६२ आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT