corona update nashik  esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात 87 रुग्‍ण कोरोना पॉझिटिव्‍ह

अरुण मलानी

नाशिक : जिल्‍हास्‍तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनकरीत्या वाढतो आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ८७ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सतरा रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत सत्तरने वाढ झाली असून, ही संख्या साडे तीनशेपार पोहचली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ३५३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (87 Patients Corona positive in nashik news update)

शुक्रवारी (ता.१) नाशिक महापालिका क्षेत्रातील ५६ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले आहे. नाशिक ग्रामीणमधील २८, मालेगावचे दोन तर जिल्‍हा बाहेरील एकाला कोरोनाची लागण झालेली आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या साडे तीनशेपार पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेल्‍या बाधितांमध्ये २४० बाधित नाशिक महापालिका क्षेत्रातील, ९३ नाशिक ग्रामीण, नऊ मालेगाव महापालिका, तर जिल्‍हा बाहेरील अकरा बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. सध्याच्‍या सक्रिय रुग्‍णांमध्ये चाळीस रुग्‍णांमध्ये लक्षणे आढळलेली आहेत. उर्वरित ३१३ बाधितांमध्ये लक्षणे नाहीत. प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत वाढ झालेली असून, सायंकाळी उशिरापर्यंत ९६१ अहवाल प्रलंबित होते. नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक ८५८ प्रलंबित अहवाल होते. नाशिक शहरातील ८९, मालेगावच्‍या चौदा रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News : २२ वर्षीय तरुणाने संपविले जीवन; चिठ्ठीवरून पाच तरुणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT