11th online admission esakal
नाशिक

अकरावीचे आठ हजार ८९६ प्रवेश निश्‍चित; आजपासून दुसरी फेरी

विक्रांत मते

नाशिक : वाढीव मुदतीनंतर अकरावी प्रवेशाच्‍या पहिल्या फेरीची प्रक्रिया मंगळवारी (ता. ३१) संपली. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत राबविल्‍या जाणार या प्रक्रियेत आतापर्यंत आठ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर १६ हजार ४८४ जागा रिक्‍त आहेत. दरम्‍यान, दुसऱ्या फेरीसाठी नव्‍याने नोंदणी आणि महाविद्यालय, शाखांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी अर्जाचा भाग दोन भरणे किंवा त्‍यात दुरुस्‍तीची प्रक्रिया बुधवार (ता. १)पासून सुरू होईल. शनिवारी (ता. ४) दुसरी गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार आहे.


नाशिक महापालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्‍या २५ हजार ३८० जागा उपलब्‍ध असून, प्रवेशाच्‍या पहिल्‍या फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. या फेरींतर्गत आठ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले असून, यापैकी ५८६ विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांतून प्रवेश मिळविले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक पाच हजार ८८१ जागांवर प्रवेश झाले असून, त्‍यापाठोपाठ मराठी माध्यमाच्या दोन हजार ८५८ आणि ऊर्दू माध्यमाच्या १५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये राज्‍य शिक्षण मंडळाचे आठ हजार १८३ विद्यार्थी आहेत, तर सीबीएसई बोर्डाच्‍या ३३१, आयसीएसई बोर्डाच्‍या ३६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. अन्‍य बोर्डाच्या १९ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली.


दुसऱ्या फेरीची प्रक्रिया

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी बुधवारपासून सुरू होणार आहे. त्‍यानुसार यापूर्वी नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया राबविता येईल. तसेच अर्जाचा भाग दोन भरणे, दुरुस्‍ती करण्याची संधी असेल. त्‍यासाठी गुरुवारी (ता. २) रात्री आठपर्यंत मुदत असेल. माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी शुक्रवार (ता. ३) राखीव ठेवला आहे, तर शनिवारी (ता. ४) दुसरी गुणवत्तायादी प्रसिद्ध होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवार (ता. ६)पर्यंत मुदत असेल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विमाननगर परिसरात जोरदार राडा

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT