Agriculture 
नाशिक

यंदा शेतकरी सुखावणार! उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत ९० टक्के खरीप पेरण्या

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक/ नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ह्यांमध्ये ४३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच या चारही जिल्ह्यांमध्ये ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्या झाल्यानंतर पाऊस सुरू झाल्याने या वर्षी शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असा अंदाज कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये २१ लाख ६२ हजार ३४५ सर्वसाधारण हेक्टर क्षेत्रांपैकी १९ लाख ५७ हजार ८२३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या प्रत्यक्ष पेरण्या झाल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात शेतीला उपयुक्त पाऊस वेळेवर पडत आहे. पाचही जिल्ह्यांत विशेष करून भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका, भुईमूग, सोयाबीन, ऊस, तूर, मूग, उडीद, तीळ, तेलबिया व सूर्यफूल ही पिके प्राधान्याने घेतली जातात.

गेल्या वर्षी मुबलक पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाची स्थिती चांगल्या प्रमाणात आकडेवारीवरून दिसून येते. नाशिक जिल्ह्यात ४५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धुळे जिल्ह्यात ४४३, नंदुरबार जिल्ह्यात २६५, तर जळगाव जिल्ह्यात ४६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विभागात ४३३ मिलिमीटर पाऊस पडला असून, १ जून ते ६ ऑगस्टपर्यंत काही दिवस पावसाने हुलकावणी दिली. पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी उत्तम प्रकारे केली असून, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत.

खरीप पेरणी विभागाची आकडेवारी
नाशिक जिल्हा ८२ टक्के
नगर जिल्हा ९८ टक्के
नंदुरबार जिल्हा ८९ टक्के
जळगाव जिल्हा ९४ टक्के
एकूण ९० टक्के

रिपोर्ट- हर्षवर्धन बोऱ्हाडे

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT