coronavirus-molecular.jpg
coronavirus-molecular.jpg 
नाशिक

Coronaupdates : सावधान!...जिल्ह्यात एका दिवसभरात 92 नवीन कोरोना रुग्ण...आणखी एक डॉक्टर पॉझिटिव्ह

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. मंगळवारी (ता.5) रात्री उशिरापर्यंत 92 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे पावणे पाचशेचा आकडा गाठला आहे. जिल्ह्यात 470 कोरोनाचे रुग्ण झाले असून जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे. 
कोरोनाचा फैलाव बघून कोरोनाचा धोका वाढतोय असेच चिन्ह दिसत आहे.

जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे 92 रुग्ण

जिल्ह्यात प्रामुख्याने देवळाली कॅम्प परिसरात 7, नाशिकमध्ये सकाळी एक आणि सायंकाळी 2 यासह येवला, सटाणा, सिन्नर याठिकाणी  दिवसभरात 92 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिकच्या बजरंगवाडीतील गर्भवती महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी कॅनडा कॉर्नर परिसरातील 75 वर्षीय महिला, गंगापूर परिसरातील 55 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तर देवळाली परिसरातील 7 इसम पॉझिटिव्ह आले आहेत. यात शिंगवेबहुला, भगूर रोडवरील दोघांसह देवळलीतील सहा जवान आहेत. तर येवल्यातील 16 जण आणि मालेगावात पुन्हा 17 आणि रात्री 45 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 92 रुग्ण सापडल्याने सोमवारच्या (ता4) 378 रुग्णांचा मंगळवारी (ता5) रात्रीपर्यंत 470 झाला. 

सिव्हिलचा आणखी एक डॉक्टरला कोरोना

नाशिक जिल्हा रुग्णालयातील आणखी एक डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गंगापूर रोड परिसरात राहणारे डॉक्टर सिव्हिलमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी असून, तीन दिवसांपूर्वी त्यांना छातीत दुखण्याचा त्रास झाला. त्यामुळे ते कॅनडा कॉर्नर परिसरातील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आला. यामुळे सिव्हिलमधील हे तिसरे डॉक्टर आहेत, जे कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यांचा रुग्णालयात सर्वत्र वावर होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात त्यांच्या संपर्कात असलेल्यांची माहिती घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT