Corona Update corona
नाशिक

मोठा दिलासा! उत्तर महाराष्ट्रात ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

विनोद बेदरकर

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत नऊ लाख २१ हजार ५३७ रुग्णांपैकी आठ लाख ९७ हजार ३०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, पाच हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात १८ हजार ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण २.०३ टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी ही माहिती दिली. (97 percent of patients have recovered from corona north maharashtra division)

उत्तर महाराष्ट्रातून विविध लॅबला तपासणीसाठी पाठविलेल्या ५२ लाख ७२ हजार ६०० अहवालांपैकी नऊ लाख २१ हजार ५३७ अहवाल पॉझिटिव्ह आले. नाशिक जिल्ह्यात चार लाख एक हजार ६८९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी तीन लाख ९१ हजार ७७५ (९७.५३ टक्के) रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एक हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के आहे. आजपर्यंत आठ हजार ४८६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे. नगरला दोन लाख ९१ हजार २१९ कोरोनाबाधितांपैकी दोन लाख ८१ हजार २३८ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तीन हजार ८८१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५७ टक्के आहे.

नगर जिल्ह्यात आजपर्यंत सहा हजार १०० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्युदर २.०९ टक्के आहे, तर जळगाव जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ५४८ पैकी एक लाख ३९ हजार ८६७ रुग्ण पूर्णत: बरे झाले. १०४ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. आजपर्यंत दोन हजार ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर १.८० टक्के आहे.

धुळे जिल्ह्यात ४५ हजार ७८२ पैकी ४५ हजार १०३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले. ११ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५१ टक्के आहे. आजपर्यंत ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर १.४५ टक्के आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात ४० हजार २९९ कोरोनाबाधितांपैकी ३९ हजार ३२६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले. १९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५८ टक्के आहे. आजपर्यंत ९५० रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्युदर २.३५ टक्के आहे.

(97 percent of patients have recovered from corona north maharashtra division)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT