corona virus update esakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात आज ५२३ पॉझिटिव्‍ह; तर ९७२ कोरोनामुक्‍त

अरूण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत घट झाली आहे. मात्र कोरोना बळींची संख्या अद्यापही आटोक्‍या बाहेर आहे. गुरुवारी (ता.३) दिवसभरात ५२३ पॉझिटिव्‍ह (Corona positive) आढळले. तर ९७२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात (Corona Free) केली. ४१ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण (Active patients) संख्येत ४९० ने घट झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात सात हजार ५९१ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (972 corona patients discharged in nashik district)

कोरोनाचा आलेख उतरता

गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रात चौदा, नाशिक ग्रामीणमध्ये २७ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १७०, नाशिक ग्रामीणमधील ३३९, मालेगावचे अकरा तर जिल्‍हा बाहेरील तिघांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक ६०२ रुग्‍ण आहेत. नाशिक शहरातील ३३८, मालेगावचे वीस तर जिल्‍हा बाहेरील बारा रुग्‍णांनी कोरानावर यशस्‍वीरीत्‍या मात केली.

१८९६ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा

सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ८९६ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील एक हजार ३०२ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. तर नाशिक शहरातील २९०, मालेगावच्‍या ३०४ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ९७७ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ८७८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात सहा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणधमील ६२ तर मालेगावच्‍या २८ रुग्‍णांचा समावेश आहे.

972 corona patients discharged in nashik district

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT