viral  sakal
नाशिक

Nashik: उकळत्या तेलात हात घालून महिला वडापाव काढते, अंगावर काटा आणणारा Video

ही महिला चक्क उकळत्या तेलात हात घालत वडापाव काढते. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

वडापाव हा महाराष्ट्रातील लोकांचं आवडतं स्ट्रीट फुड आहे. वडापाव प्रिय असणारे लोक तुम्हाल राज्यातील प्रत्येक शहरात मिळतील. त्यामुळे सर्वच शहरात वडापाव विकणाऱ्या गाड्या असतात. असाच एका वडापाव विकणाऱ्या गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडिओमध्ये वडापाव पेक्षा वडापाव बनविणाऱ्या महिलेची चर्चा जास्त होत आहे. ही महिला चक्क उकळत्या तेलात हात घालत वडापाव काढते. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. (a woman in nashik puts her hand in boiling oil to take out vadapav video goes viral)

हा व्हायरल व्हिडिओ नाशिक येथील आहे. या व्हिडिओत आपल्याला दिसते की वडापावची गाडी चालवणारी ही महिला सहजतेने उकळत्या तेलात हात टाकत वडापाव काढते. आपल्या अंगावर साधा गरम तेलाचा एखादा थेंब जरी पडला तरी आपल्याला कसं तरी होतं मात्र ही ही महिला इतक्या सहजतेने गरम तेलात हात घालते, हे बघून कोणालाही आश्चर्य वाटणार.

विशेषत: नाशिकचा चीज वडापाव खूप स्पेशल आहे. चीज वडापाव बनवणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येणार. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून काकू चमचा वापरा असा सल्लाही देत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेजी बाईट या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT