crime Case
crime Case esakal
नाशिक

Crime News: एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय मुलीचं अपहरण; तणावाखाली येऊन आई-वडिलांनी उचललं टोकचं पाऊल

अंकिता खाणे (Ankita Khane)

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय मुलीच अपहरण करण्यात आलं होतं. मुलीचं अपहरण झाल्याने तणावाखाली येऊन मुलीच्या आईवडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. (Latest Marathi News)

या घटनेआधी घोटी सिन्नर महामार्गावर आई वडील यांच्या सोबत जात असताना या 19 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार समाधान झनकरसह त्याच्या साथीदारांवर आत्महतेस प्रवृत्त करणे आणि अपहरण करणे यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून मुलीचा आणि आरोपींचा शोध सुरू आहे.(Latest Marathi News)

देवळाली कॅम्प परिसरात मुलीच्या आई वडिलांनी रेल्वेखाली उडीत घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील निवृत्ती किसन खातळे (४९) आणि त्यांची पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे (४०) हे आज दुपारी देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसरात आले. रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक 180/01 आणि 180/03 यादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी गोदान एक्सप्रेसखाली स्वतःला झोकून दिले.(Latest Marathi News)

नाशिक रोड रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची रात्री उशिरा उत्तर तपासणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप भालेराव आणि शैलेश पाटील तपास करत आहेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

GT vs CSK Live IPL 2024 : चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर तर गुजरात इलिमिनेशन टाळण्यासाठी जोर लावणार

Karnataka Crime: 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न पुढे ढकलल्याने मुलीचं डोकं उडवलं; एक दिवसापूर्वीच झाली होती दहावी पास

Latest Marathi News Live Update : आढळराव यांच्यासाठीची भोसरीतील अजित पवारांची सभा रद्द

SCROLL FOR NEXT