Palghar-advocate.jpg 
नाशिक

Palghar mob lynching : पालघर महंत हत्याकांडातील वकिलाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गडचिंचले (जि. पालघर) येथे जमावाच्या हल्ल्यात हत्या झालेल्या महंतांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या भाईंदर येथील वकिलाचा अपघाती मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवणच्या घाटात हा अपघात झाला. 

अशी घडली घटना..
ऍड. दिग्विजय त्रिवेदी असे मृत वकिलाचे नाव आहे. ते त्र्यंबकेश्‍वर येथील महंतांच्या वतीने विश्‍व हिंदू परिषदेतर्फे डहाणू न्यायालयात बाजू मांडण्यासाठी येत असताना बुधवारी (ता. 13) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर नजीक मृत त्रिवेदी त्यांच्या कार (एमएच 04, एचएम 1704)ने येत असताना मेंढवण पुलाजवळ त्यांच्या कारवरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृत त्रिवेदी मीरा-भाईंदर येथील बहुजन विकास आघाडीच्या लीगल सेलचे कामकाज पाहायचे. 

तपासाला गती 
दरम्यान, गडचिंचले महंतांच्या हत्याकांड तपासात संशयितांची संख्या 141 झाली असून, त्यात दहा जण अल्पवयीन भिवंडी येथील बालसुधारगृहात आहेत. अटकेतील 106 पैकी पाच जणांना न्यायालयाने 16 मेपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, उर्वरित न्यायालयीन कोठडीतील 101 पैकी 40 जणांना तिसऱ्या गुन्ह्यात (आरोपींना अटक करताना हल्ला करणे) तपासासाठी 18 मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुधवारी आणखी सहा नवीन संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT