Accidental death of soldier nashik accident news esakal
नाशिक

Nashik Accident News : धानोरे येथील जवानाचा पाथरेत अपघाती मृत्यू; आज अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : धानोरे येथील रहिवासी असलेला भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (२४) हे सुटीवर गावी आले असताना शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करून सोनेवाडी (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथे नातेवाईकांकडून घरी येत असताना दुचाकी पल्सर गाडीचा अपघात झाला. (Accidental death of soldier nashik accident news)

ही घटना १६ जुलैला दुपारी अडीचच्या सुमारास सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे (ता.सिन्नर) येथे घडली. श्रीराम यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून मंगळवारी (ता.१८) सकाळी अकराला धानोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

आसाम (गुवाहाटी) येथे भारतीय सैन्य दलात शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते. पंचवीस दिवसांपूर्वी सुटीवर आलेले श्रीराम राजेंद्र गुजर शिर्डी येथून देवदर्शन करून नातेवाईकांकडून घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या पल्सर (एमएच १५. एचए ९००६) दुचाकीला समोरून येणाऱ्या प्लॅटिना दुचाकीने जोरदार धडक दिली.

या अपघातात प्लॅटिनावरील व श्रीराम गंभीर जखमी झाले. श्रीराम यांच्या सोबत असलेला मावसभाऊ अक्षय ऊर्फ बबलू पांडुरंग जावळे (२५. रा. सोनगाव, ता. कोपरगाव) यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपघातानंतर पाथरेचे ग्रामस्थ व पिंपरवाडी टोल नाका मदत पथकाने श्रीराम व अपघातग्रस्तांना शिर्डी येथे साई संस्थांच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादम्यान श्रीराम यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे आजोबा संतू, आई अनिता, शेतकरी वडील राजेंद्र, भाऊ नितिन, बहीण प्रियंका असा परिवार आहे.

आज ड्युटीवर निघणार होते...

महिन्याच्या सुट्टीवर गावी आलेल्या श्रीराम नातेवाईकांना भेटून मंगळवारी (ता.१८) कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणार होते, परंतु दुर्दैवाने त्यांच्या आतच काळाने घाला घातला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीराम यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले.

दहावीपर्यंतचे शिक्षण रूई येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. नंतर बारावीचे शिक्षण विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले. पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला. श्रीराम हे भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअर कोर २३६ IWT युनिटमध्ये कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Rain Update : साताऱ्यासह विविध भागांत दमदार पाऊस; रस्‍ते जलमय; उत्तर खटाव परिसरात नदी, नाले प्रवाहित, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

'इतकं घाणेरडं गाणं...' शाहरुख-ऐश्वर्याच्या आयकॉनिक गाण्याचा रिमेक पडला महाग, हुमा कुरेशी ट्रोल

Eleventh Admission : आजपासून अकरावीची पहिली विशेष फेरी; पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक ६ जुलैला होणार जाहीर

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

SCROLL FOR NEXT