accused life imprisonment
accused life imprisonment esakal
नाशिक

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भवती करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदरची घटना एप्रिल २०२० पूर्वी घडली होती. (Accused gets life imprisonment in case of rape of minor girl Nashik Crime News)

असिफ अली अशरफ अली सैयद (३०, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. असिफ अली याने अरिंगळे मळा येथे अल्पवयीन मुलीवर तिच्या संमतीशिवाय वारंवार अत्याचार केला.

त्यामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली होती. एप्रिल २०२० मध्ये सदरील प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

तत्कालीन महिला सहायक पोलिस निरीक्षक एम. बी. राऊत यांनी गुन्हयाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहताना सात साक्षीदार तपासले.

त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. यु. कदम यांनी असिफ अली यास जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई एन. ए. वाघमारे, डी. एस. हासे, अंमलदार के. के. गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT