Husband Sentenced life imprisonment
Husband Sentenced life imprisonment esakal
नाशिक

Nashik Crime News : पत्नीच्या खुनप्रकरणी आरोपी पतीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीतील फुलेनगरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या चेहऱ्यावर दगडी पाटा घालून हत्या करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. सागर गणपत पारधी (२३, रा. मुंजाबाबा गल्ली, फुलेनगर, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. (Accused husband sentenced to life imprisonment in wifes murder case Nashik Crime News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पंचवटीतील फुलेनगर येथील मुंजाबाबा गल्लीत १८ जुलै २०२० रोजी सागरने पत्नी आरती पारधी (१८) हिच्या चारित्रावर संशय घेत घरातच तिचा गळा आवळून व तोंडावर दगडी पाटा घालून खून केला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी पारधी यास अटक केली होती.

सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक एम. एस. शिंदे व अंमलदार श्रीकांत कर्पे यांनी करीत, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची अंतिम सुनावणी बुधवारी (ता. २९) होऊन जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी आरोपीस सबळ पुराव्यानुसार जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगेश कापसे व रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी हवालदार एम. एम. पिंगळे, हवालदार डी. बी. खैरनार यांनी पाठपुरावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT