kumbhmela 123.jpg 
नाशिक

कुंभमेळ्यात दरोड्याच्‍या तयारीतील आरोपींना साध्या कैदेची शिक्षा 

अरुण मलाणी

नाशिक : पंचवटी परिसरातील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुल परिसराजवळ कुंभमेळा-२०१५ च्या कालावधीत दरोड्याच्‍या तयारीत असलेल्‍या टोळीतील नऊ जणांपैकी तिघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली होती. या तिघांना जिल्‍हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी दोन महिने ते ६३ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. 

अनेक शस्त्र आढळले
शिक्षा ठोठावलेल्‍या आरोपींची नावे श्रीराम आझाद, शिवप्रसाद आझाद आणि सुरेशकुमार नायडू (सर्व रा. उत्तर प्रदेश) अशी आहेत. २६ ऑगस्ट २०१५ला मध्यरात्री पंचवटी पोलिसांनी क्रीडासंकुलाच्‍या आवारात टोळीला संशयास्पदरीत्या फिरताना अटक केली होती. सखोल चौकशी करताना, त्‍यांच्‍याकडे गज, लाकडी दांडा, कोयता आदी शस्त्र आढळले होते.

फरारी सहा संशयितांवर खटला सुरू 

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. जे. मुळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील योगेश कापसे यांनी युक्तिवाद केला. या खटल्‍यात तीन संशयितांविरोधात खटला सुरू असताना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलिस कायदा कलम १२२ नुसार श्रीराम आझाद यास ६३ दिवस, शिवप्रसाद आझाद यास ५८ आणि सुरेशकुमार नायडू यास दोन महिन्यांची साधी कैद सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक एस. एल. जगताप यांनी काम पाहिले. या प्रकरणातील फरारी सहा संशयितांवर खटला सुरू राहील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द, १९४६ ला सुरू झालेल्या बँकेला RBIचा दणका

भारतीयांनो लगेच इराण सोडा! युद्धविरामानंतर तेहरानमधील दुतावासाचा इशारा, हेल्पलाइन नंबर जारी

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

Latest Marathi News Live Update: तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीवरून नांदेडमध्ये आंदोलन

Gratuity Money: तुमचा हक्काचा पैसा! ग्रॅच्युइटी कशी मिळते? कॅल्क्युलेशन आणि Tax नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT