Molestation Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : विनयभंग प्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ठक्कर बाजार बसस्थानकात जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने एका वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. ईशाद राजमोहमंद मणियार (३२, रा. चांदवड) असे आरोपीचे नाव आहे. (Accused sentenced to hard labor in molestation case Nashik Latest Crime News)

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या ३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकात बसमध्ये जात होत्या. त्या वेळी गर्दीचा फायदा घेत आरोपी ईशाद याने त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अशोक पाथरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे ॲड. सलीम तडवी यांनी युक्तिवाद केला. गुन्हा शाबीत झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी समीर जी. बावकर यांनी आरोपी ईशादला एका वर्षाचा सश्रम कारावास, व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार जी. ए. गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

Ambulance Policy: रुग्णांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रात नवे अ‍ॅम्ब्युलन्स धोरण लागू; ४ अ‍ॅप्सशी जोडणार, जाणून घ्या नवी प्रणाली

100 मुलांचा बाप! रशियाकडून दहशतवादाला मदत केल्याचा आरोप; आजही 15 कोटी भारतीय वापरतात त्याचे अॅप, नेमकं प्रकरण काय?

Amit Shaha : अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान २३० काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; पोलिसांवर अधिकार उल्लंघनाचा आरोप

Latest Marathi News Live Update : पुण्यात पॉवर सब-स्टेशन प्रकल्पाच्या कार्यालयाची अज्ज्ञातांकडून तोडफोड

SCROLL FOR NEXT