encroachment removed by nmc esakal
नाशिक

नवीन बसस्थानक, कुसुंबा रस्ता भागातील 215 अतिक्रमणधारकांवर कारवाई

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाने (Municipal Anti Encroachment Squad) सोमवारी (ता.२०) दुसऱ्या टप्प्यात नवीन बस स्थानक ते करीम नाका या भागातील कुसुंबा रस्त्यावरील लहान- मोठी २१५ अतिक्रमणे हटविली. अतिक्रमण विरोधी पथकाला आज (ता. २०) काही ठिकाणी अल्पसा विरोध झाला. पथकाने विरोध मोडून काढत अतिक्रमण (Encroachment) हटाव मोहीम सुरुच ठेवली. या मोहिमेत अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्यात आले. (Action against 215 encroachers in new bus stand Kusumba road area Nashik news)

अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी स्थापन केलेल्या दोन विशेष पथकाने पहिल्या टप्प्यात गटारी व नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्यास प्राधान्य दिले आहे. शुक्रवारी प्रभाग क्रमांक १ मधील कॅम्प रस्त्यावरील ८० अतिक्रमणे हटविण्यात आली होती. आज दोन जेसीबी, दोन अतिक्रमण वाहन व २५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रभाग दोनच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण निर्मुलनाची ठिकठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. नवीन बसस्थानक ते करीम नाका येथील रस्त्यास अडथळा निर्माण करणारी व गटारीवर स्लॅब, अतिक्रमण काढून गटार मोकळी करण्यात आली. या मोहिमेत २१५ अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली.

प्रभाग एकमधील निसर्ग हॉटेलसमोरील उमेश लोहारकर यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. यातील कारवाईत काही अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण केलेले साहित्य, माल, सामान आदी जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहिम सुरुच राहील. अतिक्रमणधारकांनी ४८ तासात स्वत:हून अतिक्रमण काढून घेवून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रभाग अधिकारी शाम बुरकुल, अतिक्रमण अधिक्षक शाम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व बिट मुकादम व अतिक्रमण गस्ती पथकाने आजची मोहिम राबवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

INDIA A SQUAD FOR ODI SERIES vs SOUTH AFRICA A : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वन डे संघात समावेश नाही; तिलक वर्माकडे नेतृत्व, तर ऋतुराज उप कर्णधार...

Mhada Lottery: पुण्यात ९० लाखांचे घर फक्त २८ लाखांत मिळणार! म्हाडाची मोठी घोषणा; अर्ज कधी आणि कसा करायचा?

Jalgaon News : जळगावकरांची प्रतीक्षा वाढली; अवकाळी पावसामुळे ई-बस आगाराचे काम रखडले, नवीन वर्षातच बससेवा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : रेशनवर मिळालेले खराब धान्य शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवले

SCROLL FOR NEXT