ZP CEO Ashima Mittal esakal
नाशिक

Nashik ZP News : सुरगाण्याच्या मूलभूत सुविधांसाठी झेडपीचा Action Plan!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गुजरात सीमावर्ती भागातील सुरगाणा तालुक्यातील ५५ हून अधिक गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या गावांना गुजरात राज्याला जोडण्याची मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे मित्तल यांनी मान्य करत, या गावांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद स्तरावर ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला जाणार आहे. यात प्रामुख्याने या गावांना रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य व शिक्षण या सुविधा पुरविण्याबाबत आराखडा तयार केला जात असून, १५ दिवसात हा प्लॅन जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. (Action Plan of Nashik ZP for basic facilities of Surgana nashik news)

याबाबत, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गुरुवारी (ता.१५) पत्रकारांशी संवाद साधला. सुरगाणा तालुक्यातील गावांच्या सुविधांबाबत तक्रारी असल्याने गावांना भेटी दिल्याचे सांगत मित्तल यांनी उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत पाहणी केल्याचे सांगितले. येथील आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करायचे असल्याने ते स्थलांतर करण्याबाबत चर्चा झाली. मुख्यतः या भागात २१ हून अधिक गावांना रस्ते जोडले नसल्याचे दिसले.

त्यासाठी नरेगा मधून रस्त्यांची कामे करण्यावर भर दिला जाणार आहे. पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जात असल्याची समस्या असल्याने, त्याबाबतही नियोजन केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या गावांमध्ये सिमेंट बंधारे बांधता येणे शक्य आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या गावांना कोणत्या मूलभूत सुविधा नाही, याबाबत आराखडा तयार केला जात आहे.

दोन ग्रामसेवकांवर ही जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या कच्चा आराखडा तयार करून तो अंतिम केला जाईल असे मित्तल यांनी नमूद केले. या गावांमधील शाळा, अंगणवाडी दुरुस्त्या करण्याबाबत प्रस्ताव तयार केले जाणार आहेत. आरोग्य केंद्राची असलेली दुरवस्था, रिक्त जागा याबाबत माहिती घेतली जात आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या भेटीत तालुक्यातील ६१ पैकी ५३ सरंपच यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्याकडून गावातील समस्या जाणून घेत, चर्चा केल्याचे मित्तल यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.

भूमीसाठी आग्रही

सुरगाणा तालुक्यातील १२२ गावांना स्मशानभूमी नसल्याने या गावांना स्मशानभूमी व्हावी, यासाठी जिल्हा परिषद आग्रही आहे. जनसुविधा अंतर्गत यातील काही गावांना स्मशानभूमी मिळणार आहे. मात्र, तालुक्यातील सर्व स्मशानभूमींसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अतिरिक्त निधी मिळावा याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी प्रस्ताव सादर केला असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी सांगितले. तसेच, स्मशानभूमीसाठी खासदार, आमदार निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. निधी मिळाल्यास या तालुक्यातील स्मशानभूमींचा प्रश्न निकाली लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Leader Kirit Somaiya : सोमय्या बॅक इन ॲक्शन! मंत्री मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर दिलं खळबळजनक उत्तर

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात फुल्ल AC चालवूनही वीजबिल होईल 30% कमी; आजपासूनच फॉलो करा 'या' स्मार्ट टिप्स

Gadchiroli : भाजप नेत्याचा अपघाती मृत्यू, महिन्याभरापूर्वी उधळलेला विजयी गुलाल

Israel - Iran War युद्धाचा भडका! इस्रायलचा इराणवर हल्ला, देशात आणीबाणी लागू; एअरस्पेस बंद, सर्व शाळांना सुट्टी

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

SCROLL FOR NEXT