Court Order  esakal
नाशिक

Nashik Crime: 18 वीजचोरी प्रकरणात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : महावितरण कंपनीने वीजचोरी शोधण्यासाठी इंदिरानगर, वडाळा भागात तपासणी मोहीम राबवत १८ वीजचोर शोधले. लाखोंची वीज चोरी पकडण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.

सोमवारी (ता. १८) मुख्य अभियंता दीपक कुमठेकर आणि नाशिक अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर, वडाळा गाव, मेहबूबनगर, साईनाथनगर, अशोका मार्ग आदी भागात पथके तयार करून मोहीम राबविली. (Action taken in 18 power theft cases Nashik Crime)

या अंतर्गत सुमारे १०० कनेक्शन चेक करण्यात आले. त्यापैकी १८ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे आढळले. सदर ग्राहकांना चोरीचे बिल देण्यात आले असून, नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

कोणीही वीज चोरी करत असल्यास त्याची माहिती महावितरण कंपनीला पुरविल्यास त्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल तरी ग्राहकांनी वीज चोरी विषयी माहिती द्यावी, असे आवाहन इंदिरानगर कक्षप्रमुख मंगेश सोनगिरे यांनी केले आहे.

मोहिमेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर सोनवणे, विशाल निंबाळकर, हेमंत बिरूड, सतीश माहेर, नितीन कातकडे आदींनी भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT