मनमाड (नाशिक) : विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या ५९०० फुकट्यांकडून वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात आलेल्या कारवाईत एका दिवसात ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला.
तर भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात विनातिकिट प्रवास करणाऱ्या २९८ प्रवाशांकडून एक लाख ८१ हजार २६० रुपये दंड वसूल केला. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकावर आणि प्रवाशी रेल्वे गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांविरुद्ध एक दिवसीय तपासणी मोहीम राबवण्यात आली.
मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी विविध भागांत येणाऱ्या गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांवर अचानक धाड पडल्यावर विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणून गेले होते. भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली व भुसावळ विभागाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गर्शनानुसार मोहिम राबिण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.