नाशिक (जि. नाशिक) : रासायनिक खतांच्या गोणीवर छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने खत विक्री केल्यास खत विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला. (Action will be taken if the fertilizer is sold at a higher rate than the price)
केंद्र सरकारच्या एनबीएस (न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी) धोरणानुसार यूरिया खत वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचा अधिकार खत उत्पादक कंपनीस आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असा दाखला देत काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खते या खतांच्या किमतीत वाढ केली आहे. सद्यःस्थितीत बाजारात जुन्या किमतीची खते उपलब्ध आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या गोणीवर छापलेल्या किमती तपासून त्याप्रमाणे रक्कम देऊन शेतकऱ्यांनी खते खरेदी करावीत. छपाई किमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या, तरी जुन्या दराची खते (जुने दर छपाई असलेल्या बॅगा) जुन्याच दराने शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. याबाबत सूचना खत विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
कुठलाही विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवावी अथवा जिल्हा संनियंत्रण कक्ष (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ९४२३७२६३२४, मोहीम अधिकारी ९८३४३७३८६१) यांच्याकडे तक्रार नोंदवावी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी ही माहिती दिली.
Action will be taken if the fertilizer is sold at a higher rate than the price
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.