active corona patients reduced by 208 in nashik marathi news 
नाशिक

जिल्ह्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त अधिक; ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णसंख्येत २०८ ने घट 

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात पुन्‍हा एकदा नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या एक हजारहून कमी राहाण्यासोबतच, बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रूग्‍णांची दिवसभरातील संख्या अधिक राहिली. दिवसभरात ९०७ बाधित आढळले तर १ हजार १०१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. चौदा रुग्‍णांचा जिल्‍ह्‍यात मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णसंख्येत २०८ ने घट झाली असून, सद्य स्‍थितीत ९ हजार ३०० बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

सोमवारी आढळलेल्‍या नवीन कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ६७४, नाशिक ग्रामीणचे २१०, मालेगावचे २० तर जिल्‍हाबाह्य तीन रूग्‍ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ६७६, नाशिक ग्रामीणचे ४१५ मालेगावचे तीन तर जिल्‍हाबाह्य सात रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. चौदा मृत्‍यूंपैकी बारा नाशिक शहरातील असून, नाशिक ग्रामीणच्‍या दोघा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांची संख्या ८१ हजार ०२३ वर पोहोचली आहे. यापैकी ७० हजार २७२ रूग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. १ हजार ४५१ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

दरम्‍यान दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार २७६, नाशिक ग्रामीणचे ११६, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय १७ आणि जिल्‍हा रूग्‍णालयात आठ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ४३० संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ९८२ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : आवेश खानवर बंदीची कारवाई? अतिउत्साह महागात पडणार, लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज अडचणीत सापडणार

Gobar Tax: पाकिस्तानने गायी-म्हशीच्या शेणावरही लावला कर; जगभरात चर्चा, काय आहे गोबर टॅक्स?

Buldhana : अन्नातून विषबाधा, तीन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू; आईवर उपचार सुरु...

Latest Marathi News live Update : दिव्यांग उमेदवारांचे आंदोलन; भरतीतील अन्यायाविरोधात संताप, आंदोलकाचा मृत्यू

Pune News : अमली पदार्थांचे विक्रेते, पुरवठादार व सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर; पोलिस आयुक्तांनी घेतली झाडाझडती

SCROLL FOR NEXT