Former MLA Marotrao Pawar felicitating Krishna Tanpure, who won a gold medal in triathlon
Former MLA Marotrao Pawar felicitating Krishna Tanpure, who won a gold medal in triathlon esakal
नाशिक

Success in Triathlon : आडगाव रेपाळच्या कृष्णा तनपुरेने ट्रायथलॉनमध्ये भारतासाठी मिळवले पहिले सुवर्ण!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : एकाचवेळी पोहणे, सायकलिंग अन्‌ धावणे, या नव्याने प्रचलित होत असलेल्या ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत आडगाव रेपाळ येथील कृष्णा बाबासाहेब तनपुरे या युवकाने स्वतःसोबतच भारताचे नाव रोशन केले आहे.

अबुधाबी (दुबई) येथे झालेल्या या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा कृष्णा हा पहिला खेळाडू ठरला आहे. (Adgaon Repals Krishna Tanpure wins Indias first gold in triathlon at abudhabi nashik news)

घरी अत्यंत गरीब परिस्थिती असताना, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून थेट वर्ल्डकप स्पर्धा गाजविणाऱ्या कृष्णाने देशाची शान वाढवली आहे. ट्रायथलॉनमध्ये चमकदार कामगिरी करून कांस्यपदक आणि आपल्या गटात सुवर्णपदक मिळवत कुटुंब व गावाचे नाव उंचावल्याने कृष्णा तनपुरेचा ग्रामस्थांतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

या वेळी माजी सभापती विठ्ठल शेलार अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, पोलिस संदीप सांगळे प्रमुख पाहुणे होते. या स्पर्धेत कृष्णाने भारतासाठी प्रथमच नेतृत्व केले. या खेळात करिअर करण्याची खूणगाट शालेय जीवनापासूनच बांधून मागील सहा वर्षांपासून तो मेहनत घेत आहे.

सुरवातीला येवल्यातील जनता विद्यालय व नंतर लासलगाव, नाशिक, पुणे असा शैक्षणिक प्रवास करत असताना तुर्कस्तान येथे निवड झाल्यानंतर कृष्णा तनपुरेच्या स्वप्नांना खरा आकार मिळाला. यासाठी माजी आमदार श्री. पवार यांनी त्याला एक लाखांची मदत करून परदेशात खेळण्याला जाण्यासाठी पंखात बळ भरले.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

दरम्यान, नागरी सत्कार सोहळ्यात गावातील भारतीय सैन्य दलात असलेल्या जवानांचाही सत्कार झाला. श्री. बनकर, श्री. शेलार यांनीही कृष्णाच्या जिद्दीने कौतुक केले. कृष्णाचे वडील बाबासाहेब तनपुरे, आजोबा भाऊराव तनपुरे, आई व आजीलाही या वेळी गौरविण्यात आले.

टायगर ग्रुपतर्फे गणेश सोमासे व पदाधिकाऱ्यांनी कृष्णाचा सत्कार केला. सरपंच सुनीता तुकाराम गुंजाळ, शिवाजीमहाराज गायके, अंबादासमहाराज जगताप, शिवाजी निकम, अशोक माने, बबन कवडे, उपसरपंच रामकृष्ण निकम, गोरख जगताप, नारायण गुंजाळ, अंबादास तनपुरे, संजय तनपुरे, सुनील तनपुरे, मच्छिंद्र तनपुरे, ज्ञानेश्‍वर तनपुरे, अरुण तनपुरे, नामदेव तनपुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

"भारतासाठी खेळायचे हे स्वप्न घेऊन महाविद्यालयात असल्यापासूनच प्रचंड सराव करण्यास प्राधान्य दिले. परिस्थिती बेताची असली, तरी माजी आमदार मारोतराव पवार व इतरांनी नेहमीच पाठबळ दिले. यामुळेच भारतासाठी खेळू शकलो. आता पुढील वर्षी ऑलम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेत आहे." -कृष्णा तनपुरे, भारतीय खेळाडू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT