sabudana esakal
नाशिक

Adhik Maas 2023 : राज्याबाहेर भगरीला परराज्यात मागणी; अधिकमासात फराळासाठी साबूदाणा, फलाहाराला पसंती

सकाळ वृत्तसेवा

Adhik Maas 2023 : श्रावण महिन्यापासून सणला प्रारंभ होत असतो. यंदा श्रावणाआधीच अधिकमास आल्याने व्रतवैकल्य, उपवास करणाऱ्यांना दोन महिने श्रावण महिन्याचे उपवास करावे लागत आहेत.

त्यामुळे उपवासाच्या फराळासाठी उपवासकर्त्यांकडून साबूदाण्याला पसंती असून, शहरात साबूदाण्याची नेहमीपेक्षा पाचपटीने विक्री वाढली आहे. त्याबरोबरच केळी, रताळे आणि सफरचंद या फळांनाही मागणी वाढली आहे. (adhik maas 2023 people preferring sabudana and fruits to eat nashik news)

गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात सध्या भगरीला चांगली मागणी आहे. तर केळीच्या दरातही मोठी वाढ पाहावयास मिळत आहे.

आषाढीच्या वारीपासून महाराष्ट्रात एकप्रकारे धार्मिक उत्सवाला सुरवात होते. त्यानंतर श्रावणापाठोपाठ गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे सण येतात. या काळात उपवासाच्या खाद्यपदार्थांना मागणी वाढते. सलग दोन महिने श्रावणाचे उपवास करावे लागणार आहेत.

शहरात साबूदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरही वाढलेले आहेत. साबूदाण्याप्रमाणेच बटाट्यांनाही मागणी वाढलेली आहे. परंतु बटाट्याचे दर स्थिर आहेत.

‘रेडी टू कुक’ भगर लवकरच बाजारात

उपवासासाठी साबूदाण्याप्रमाणेच भगरीलाही पसंती असते. परंतु महाराष्ट्रात आषाढी-कार्तिक एकादशी आणि नवरात्रीच्या काळातच भगरीला विक्रमी मागणी असते. अधिकमास वा श्रावणात भगरीला फारशी मागणी नसते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याउलट महाराष्ट्राबाहेर मात्र भगरीला मागणी वाढलेली आहे. यात प्रामुख्याने गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात सध्या भगरीला चांगली मागणी आहे. तसेच, लवकरच ‘रेडी टू कुक’ भगरही लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

केळीच्या दरात वाढ

साधारणतः: केळीचे दर ३० ते ४० रुपये डझन असतात. मात्र अधिकमास सुरू झाल्यापासून केळीचे दर ५० ते ६० रुपये डझन आहेत. याप्रमाणे, सफरचंद, रताळे यांसह खजूर, राजगिरा लाडू यांचीही मागणी वाढली आहे. फळांच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

"अधिकमासात साबूदाण्याची होलसेल आणि किरकोळ विक्री वाढली आहे. विशेषतः नेहमीपेक्षा सुमारे पाचपटीने वाढ झालेली आहे. श्रावण मासात आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे. उपवासाच्या पदार्थांचीही मागणी काही प्रमाणात वाढलेली आहे." - प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, धान्य किराणा घाऊक किराणामाल संघटना, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT