Trimbakeshwar temple esakal
नाशिक

Adhik Shravan Maas 2023 : श्रावणानिमित्त त्र्यंबकेश्‍वरमध्ये स्नान अन दर्शनास भाविकांची मांदियाळी!

सकाळ वृत्तसेवा

Adhik Shravan Maas : अधिक-श्रावण मासानिमित्त येथे तीर्थस्नान अन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे.

उत्तर भारतीयांचा अधिक-श्रावण मास पौर्णिमेपासून सुरु झाल्याने रविवारी (ता. १६) आणि सोमवारी (ता. १५) पहाटे चारपासून कुशावर्तासह मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रांगा रात्रीपर्यंत होत्या. (adhik shravan maas 2023 queue for darshan in trimbakeshwar temple nashik news)

त्र्यंबकेश्‍वरमध्ये उभारण्यात आलेल्या वाहनतळाचे उदघाटन व्हायचे आहे. त्यामुळे वाहने रिंग रोडवर उभी करून वाहनधारकांकडून मोठ्याप्रमाणात पैसे उकळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काहींची मजल मंदिराच्या पूर्व दरवाजात चारचाकी नेण्यापर्यंत गेली आहे. शहरभर रस्त्यात दुकाने आणि हातगाडीवर व्यवसाय थाटल्याने पादचाऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे.

ज्योतिर्लिंग दर्शनासाठी उत्तर महाद्वाराच्या समोर भर रस्त्यात रांगा लागल्याने पायी जाण्यासाठी आणि वाहनांसाठी जागा शिलल्क नव्हती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या भागात सर्वांना कसरत करावी लागत होती. दरम्यान, दोन्ही दिवस भाविकांच्या वर्दळीमुळे रस्त्यात पूर्व व उत्तर दरवाजा भागात रात्रीपर्यंत रांगा होत्या.

देणगी दर्शनासाठी दोनशे रुपये देऊन दोन ते तीन तास, तर पूर्व दरवाजाच्या रांगेतून दर्शनासाठी सहा ते सात लागत होते. भाविकांचा उत्साह पाहता, नीज श्रावणपर्यंत दोन महिने गर्दी राहण्याची शक्यता असून सुलभ दर्शन व वाहनतळाची व्यवस्था झाल्यास रस्ते मोकळे होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT