Sandvyavarchi Devi News
Sandvyavarchi Devi News esakal
नाशिक

Adimaya- Adishakti : एकमेव वीर आसनातील बैठकीतील सांडव्यावरची देवी

सकाळ वृत्तसेवा

पंचमी नवदुर्गामाता स्‍कंदमाता

नमामि स्‍कन्धमातास्‍कन्धधारिणीम।|

समग्रतत्वसागरमपारपारगहराम् ।।

भारतात वीर आसनात बैठकीत विराजमान या देवीचे फक्‍त दोनच ठिकाणी मंदिर आहे. एक आसाम व नाशिक येथील सांडव्यावरची देवी. हे मंदिर पेशवेकालीन सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे आहे. साक्षात सप्तशृंगीदेवीचे रूप असलेली सांडव्यावरची देवीचे भव्य अष्टभुजा रूप अतिशय मनमोहक आहे. (Adimaya Adishakti only goddess sitting in veer asana sandvyavarchi devi Nashik Latest Marathi News)

आख्यायिका

नारोशंकर राजेबहाद्दर हे वणीच्या जगदंबेचे निस्‍सीम भक्‍त होते. बहुतेकदा वणीला त्‍यांचे वारंवार जाणे असे. देवीची आराधना ते सतत करीत. वार्धक्यामुळे त्यांना दर्शनाला जाणे शक्य होईनासे झाले. त्या वेळी त्यांनी जगदंबेला साकडे घातले. यानंतर देवीने त्यांना साक्षात्कार दिला व मी तुझ्याबरोबर येईन, मात्र मी येत असताना तू मागे वळून पाहायचे नाही. नारोशंकरांचा पंचवटी येथे राजेबहाद्दर वाड्याकडचा प्रवास सुरू झाला.

त्‍यांच्‍या पाठोपाठ देवीही होती. गंगेकाठी आल्‍यावर गंगा ओलांडताना जगदंबेच्‍या काळजीपोटी त्‍यांनी मागे वळून पाहिले आणि देवी तेथेच स्‍तब्‍ध होऊन अतिशय मनमोहक रूपात वीर आसनात देवी त्‍याच ठिकाणी स्‍थानापन्न झाली. दर वर्षी पुराच्या पाण्यात न्हाहूनही देवी जशीच्या तशी आजही विराजमान आहे. साऱ्या जगताची आई अंबा तिची महती सर्वदूर प्रसिद्ध आहे. मंदिरासमोर मोठी दगडी दीपमाळही आहे.

नारोशंकर हे पेशव्यांचे सरदार होते. त्‍यांनीच देवीच्‍या मंदिराशेजारील महादेवाचे मंदिर बांधले आहे. आज नारोशंकराचे मंदिर म्‍हणून प्रसिद्ध आहे. नवरात्रातील देवीचा शृंगार अतिशय नावीन्यपूर्ण आहे. पहिल्‍या माळेपासून देवीला दैनंदिन महावस्त्र, तसेच तिच्या शृंगारात पहिल्‍या माळेपासून ते नवमीपर्यंत दागिन्यांचा वेगवेगळ्या प्रकारातील साज ज्‍योती बहाद्दर या स्वतः देवीला चढवतात. शृंगारातील देवीचे रूप अतिशय मनमोहक व खुलून दिसते.

"देवीची सेवा करतानाचा अनुभव व समाधान अगण्य असा आहे. तसेच माझी पत्‍नी ज्‍योती ही अगदी हौशीने देवीचा साजशृंगार करत असते. आमची ही चौदावी पिढी व कुटुंबातील सर्वजण अतिशय उत्‍साहाने यात सहभागी होत असतो."- मधुसूदन राजेबहाद्दर, चौदावी पिढी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT