Panch Turewale devi mandir esakal
नाशिक

Adimaya- Adishakti : पंच तुरेवाले देवी मंदिर

सकाळ वृत्तसेवा

नवमी नवदुर्गा माता सिद्धदात्री
स्‍मेरमुखीशिवपत्‍नीसिध्दिदात्रीनमोअस्‍तुते ||

नेहरू चौकात अठराभुजा असलेली वाघावर आरूढ देवी मंदिर आहे. सुमारे १५० वर्षांपूर्वींचे हे मंदिर आहे. नेहरू चौकात पूर्वी बोहाड्याचा कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात होत असे. त्‍यामुळे ‘बोहड्याची देवी’ म्‍हणूनही ही देवी प्रसिद्ध आहे. (Adimaya Adishakti Panch Turewale Devi Temple Nashik Latest Marathi News)

आख्यायिका

(कै.) गणपतदादा वाघ व त्‍यांच्या मित्रपरिवाराने या देवीची स्‍थापना केली. पुणे येथील कारागिराकडून ही मूर्ती बनविली आहे. मूर्तीचे वैशिष्ट्ये म्‍हणजे ही मूर्ती लुकणाची म्‍हणजेच कागदाच्या लगद्यापासून बनविलेली आहे. मंदिर नदीकाठी असल्‍यामुळे येणारा पूर लक्षात घेता देवी वाघावर असली तरी खाली स्टँड बनवून घेतले आहेत. तसेच, पुरातही कायमस्वरूपी म्‍हणून देवीची दगडी मूर्तीही आहे. पूर्वी जुने नाशिक येथील चव्हाट्यावरील मंडळी कलगी म्‍हणून व दिल्‍ली दरवाजातील पंच मंडळी तुरा यांच्‍यात प्रश्‍नोत्‍तराचा जंगी सामना होत असे.

तुरे मंडळी बाजी मारत असत. तसेच बोहडा नाचविणे हा कार्यक्रमही मोठ्या उत्‍साहात होत असे. नेहरू चौकातील तुरा मंडळी वा तुरा पंच म्‍हणून ‘पंचतुरेवाले देवी’ म्‍हणूनही देवी प्रसिद्ध आहे. तसेच, पूर्वी बोहडा नाचविण्‍याचा कार्यक्रम मोठया प्रमाणावर व उत्‍साहात होत असे म्‍हणून बोहड्याची देवी’ असेही म्‍हणतात. २०१५ मध्ये देवीचे संवर्धन करण्यात आले. वाघ कुटुंबीयांचे वारस वासुदेव वाघ व कुटुंबीय देवीची पूजा करत आहेत. येथे नवरात्रोत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा होतो. अष्‍टमीला होमहवन करून प्रसादवाटप केले जाते. स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेली देवी जागृतस्‍थान आहे. सध्याच्या कार्यकारिणीमार्फत मंदिराचा कारभार सांभाळला जातो.

"नेहरू चौक व परिसरात वास करणाऱ्या देवीची सर्वांवर कृपादृष्‍टी आहे. भक्‍तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी पूर्वी स्थानिक मंडळी कामानिमित्त इतरत्र स्थित झालेली असली तरी देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात." - वासुदेव वाघ, पुजारी Remarks :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Viral Video : विराट कोहलीची 'कॉपी' करायला गेला, बाबर आझम स्वतःच्याच जीवाशी खेळला... थोडक्यात वाचला, सर्व खेळाडू पळत आले...

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

SCROLL FOR NEXT